मालवाहू गाडीची धडक; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:57 AM2020-07-04T10:57:18+5:302020-07-04T11:00:01+5:30

या अपघातामध्ये दुचाकीवरील तारसिंग राठोड ही वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली.

Two killed in an accident on Akot - Shegaon road | मालवाहू गाडीची धडक; दोन ठार

मालवाहू गाडीची धडक; दोन ठार

Next
ठळक मुद्देसुरेशचंद राठोड यास रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.अपघात होताच मालवाहू वाहनाचा चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. उरळ पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
कवठा : निंबा फाट्यावरून शेगावकडे जात असलेल्या मालवाहू गाडीने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना, शुक्रवारी ३ जुलै रोजी निंबा ते शेगाव मार्गावर कवठ्यानजीक घडली. याप्रकरणी उरळ पोलीस स्टेशनमध्ये मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निंबा ते शेगाव मार्गावर निंबा फाट्यावरून शेगावकडे जात असलेला मालवाहू क्रमांक एमएच २८ बीबी २६२० त्याच्या विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी क्रमांक एम एच ३० एजी ७२८२ ला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील तारसिंग राठोड ही वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडली. गंभीर जखमी असलेला दुचाकीचालक सुरेशचंद राठोड यास रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच मालवाहू वाहनाचा चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी उरळ पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Two killed in an accident on Akot - Shegaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.