मूर्तिजापूर : शेतात जात असलेल्या दोन शेतकर्यांवर रानडुकरांनी हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याची घटना गुरुवार, १९ जून रोजी तालुक्यातील गोरेगाव येथे घडली.
मूर्तिजापूर तालुक्यात शेतीच्या मशागतीला वेग आला असून, शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात राबत आहेत. गोरेगाव (पुंडलिक महाराज) येथील शेतकरी सुभाष नामदेव गोरे (४२) व विष्णू भालचंद्र मालवे (४७) हे दोघे त्यांच्या शेतात जात असताना १९ जून रोजी नदीच्या काठावर दडून बसलेल्या रानटी डुकरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यात दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले. या दोघांवरही येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}