शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा पोलीस स्टेशनसमोर दोन गटात हाणामारी

By admin | Updated: January 8, 2015 00:43 IST

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

तेल्हारा : तेल्हारा पोलीस स्टेशनसमोरच बुधवार, ७ जानेवारीला दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने काहीकाळ तेल्हारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरात आकोट, हिवरखेड, दहीहांडा पोलीस ताफ्यासह आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.येथील सेठ बन्सीधर विद्यालयातील एका विद्यार्थ्याला शाळेच्या परिसरात जाऊन मारहाण केल्याने वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही गट पोस्ट ऑफिससमोर येऊन त्यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाची हाणामारी झाली. यानंतर काही युवकांनी पोलीस स्टेशनसमोर हाणामारी केली. हा प्रकार लक्षात येताच ठाणेदार शे. अन्वर यांनी आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व जमाव पांगविला. न. प. कार्यालयासमोर लोकांची गर्दी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दोन गटातील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून तेल्हारा ठाणेदारांनी आकोट, दहीहांडा, हिवरखेड येथील पोलीस कुमक बोलावून घेतली. दरम्यान आकोटचे पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी कुठल्याही गुन्हा दाखल नव्हता.