शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी

By admin | Updated: May 29, 2014 23:24 IST

शेतकर्‍याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी केली.

अकोला : वाडेगावचा मंडळ अधिकारी आणि नकाशीच्या तलाठ्यासाठी शेतकर्‍याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या दोघा लाचखोरांना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघाही लाचखोरांची कारागृहात रवानगी केली. प्रमुख सूत्रधार वाडेगावचा मंडळ अधिकारी व तलाठ्याचा पोलिस शोध घेत आहेत. माझोडचे शेतकरी गजानन सुधाकर हागे (५५) यांचे नावे असलेल्या भरतपूर शिवारातील साडेसहा एकर शेतीच्या सातबारामध्ये पत्नी प्रमिला हागे हिच्या नावाची नोंद न करण्यासाठी त्यांना वाडेगावचा मंडळ अधिकारी संतोष कर्णेवार (परिवार कॉलनी) आणि नकाशीचा तलाठी अमित सुधाकर सबनिस (परिवार कॉलनी) या दोघांनी ७0 हजार रुपयांची लाच मागितली. चर्चेअखेर ३५ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. गजानन हागे यांनी २३ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पैसे देण्याचा दिवस ठरल्यानंतर बुधवारी संतोष कर्णेवार आणि अमित सबनिस यांनी कोतवाल गीरधर श्रीधर घोगरे (भरतपूर) आणि विजय गजानन काळे (भरतपूर) या दोघांना माझोड येथे पैसे घेण्यासाठी पाठविले. त्यांनी ३५ हजार रुपयांची हागे यांच्याकडून लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दोघांना अटक केली. दोघा आरोपींना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघाही लाचखोरांची कारागृहात रवानगी केली.