शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार २७ हजार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहक महावितरणच्या ‘रडार’वर

By atul.jaiswal | Updated: February 26, 2020 16:56 IST

२७ हजार ६५ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी ३२ कोटी ११ लाख रूपयांवर गेली आहे.

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील २७ हजार ६५ औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी ३२ कोटी ११ लाख रूपयांवर गेली आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मोहिम हाती घेतली असून, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना उद्दीष्ट देण्यात आले आहे. याशिवाय कारवाई झाली कि नाही याची पडताळणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले परिमंडळ कार्यालयाचे पथक विविध ठिकाणी आकस्मिक भेटी देणार आहे.सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या या मोहीमेत थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयाने २९ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. त्यामुळे नियमीत वीज बिलांचा भरणा करणाºया ग्राहकांना अडथळा ठरणºया या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई न करणाºया कर्मचाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याचे निर्देश मुख्य अभियंता अनिल डोये यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिले आहेत.अकोला जिल्हयातील ९ हजार ४८८ वाणिज्यिक ग्राहकांकडे सर्वात जास्त म्हणजे १० कोटी ८८ लाख ०६ हजार रुपए वीज बिलाचे थकित आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ९ हजार १२३ ग्राहकांकडे ०७ कोटी १० लाख ६३ हजार, तर वाशिम जिल्ह्यातील ४ हजार ९६ ग्राहकांकडे ७ कोटी १७ लाख ३५ हजार रुपए वीज बिलाची थकबाकी आहे.औद्योगिक ग्राहकाचा विचार केला तरअकोला जिल्ह्यातील १ हजार ५८९ ग्राहकांकडे ०२ कोटी ८० लाख रूपयाची आहे. बुलढाणा जिल्हयातील १ हजार ९६६ ग्राहकांकडे ०२ कोटी ६६ लाख १६ हजार , तर वाशिम जिल्ह्यातील ८०४ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख रूपयाची वीज देयके थकित आहे. त्यामुळे महावितरणची वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज बिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन अकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणाwashimवाशिम