शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 23, 2014 00:38 IST

वस्त्रोद्योग घटकांसाठी शासनाचे नवे धोरण कितपत फायदेशीर ठरणार?

राम देशपांडे / अकोला राज्य शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग घटकांसाठी नुकत्याच दोन सवलती योजना जाहीर केल्या. सहकार व पणन महासंघांतर्गत सुरू असलेल्या वस्त्रोद्योग घटकांसाठी निश्‍चितच या योजना फायदेशीर ठरणार आहेत. मात्र, अखेरच्या घटका मोजून विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कायमच्या बंद पडलेल्या सूत गिरण्या व वस्त्रोद्योगांना पुन:संजीवनी देण्यासाठी शासनाचं हे नवीन धोरण कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवेल. कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पतक्षेत्रात सहकार, पण आणि वस्त्रोद्योग विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. या विभागाकडून ग्रामीण वित्त, कृषी विपणन, औद्योगिक सहकार, बाजार नियामक आणि वित्त साहाय्य अशा विविध बाबींवर लक्ष केंद्रित केलं जातं. राज्यातील सहकार क्षेत्र, कृषिउत्पादन पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रशसन आणि सनियंत्रणावर वर्चस्व ठेवणार्‍या या विभागाद्वारे २४ नोव्हेंबर रोजी वस्त्रोद्योग धोरणांतर्गत दोन सवलतीच्या योजना जाहीर करण्यात आल्या. विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील नवीन व विस्तारिकरणाच्या वस्त्रोद्योग घटकांसाठी १0 टक्के भांडवली सवलत व केंद्र पुरस्कृत वस्त्रोद्योगांना दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत या दोन योजना जाहीर करण्यात आल्या.कृषी पणन संचालनालय व हातमाग, यंत्रमाग व सहकारी वस्त्रनिर्माण संचालनालयामार्फत विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातातील कृषिमालाशी निगडित राज्यातील सर्व सूत गिरण्या, हातमाग व यंत्रमाग सहकारी संस्थांना या दोन्ही सवलतींचा निश्‍चित फायदा होणार आहे. मात्र, गतकाळात राज्यात शेवटच्या घटीका मोजून बंद पडलेल्या वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी या योजनांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे मत अकोल्यातील प्रेदेश इंटक सचिव तसेच केंद्रीय इंटकचे विशेष आमंत्रित सदस्य प्रदीप वखारिया यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. एकेकाळी कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेले खामगाव शहराची ख्याती केव्हाच लोप पावली आहे. कापसाच्या निर्यातीसाठी इंग्रजांनी खामगाव ते जलंब दरम्यान टाकलेला रेल्वे मार्ग आता नुसता नावालाच उरला आहे.