शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

४०० रुपयांत नळ जोडणी; कर्मचाऱ्यांची उडवाउडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 13:32 IST

कामचुकार कर्मचाºयांच्या विचित्र भूमिकेमुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त झाले आहेत.

अकोला: सर्वसामान्य अकोलेकरांना अवैध नळ जोडणी वैध करून घेणे तसेच नवीन नळ जोडणीसाठी ४०० रुपये शुल्क आकारण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय माजी महापौर विजय अग्रवाल यांनी घेतला होता. या मोहिमेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आज रोजीसुद्धा ही मोहीम सुरू असली तरी झोननिहाय ठाण मांडलेल्या जलप्रदाय विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना या मोहिमेबद्दल उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचे समोर आले आहे. कामचुकार कर्मचाºयांच्या विचित्र भूमिकेमुळे सर्वसामान्य अकोलेकर त्रस्त झाले आहेत.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी महापौर विजय अग्रवाल यांनी अवैध नळ जोडणी तसेच वैध नळ जोडणीसाठी केवळ ४०० रुपये शुल्क आकारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने नळ जोडणी शोधमोहिमेत २० हजारापेक्षा अधिक नळ जोडण्या अवैध ठरविल्या होत्या. आतापर्यंत ८० हजारापेक्षा अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे. यापैकी ३२ हजार नळ वैध आहेत, तर २४ हजारापेक्षा अधिक मालमत्तांमध्ये नळ जोडणीच नाही. अवैध नळ जोडणी वैध करणे तसेच नवीन नळ जोडणी घेण्यासाठी मनपाकडून आकारले जाणारे शुल्क जास्त असल्यामुळे नागरिकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता माजी महापौर विजय अग्रवाल यांनी ४०० रुपयांत नळ जोडणी वैध करण्याचे निर्देश दिले. या मोहिमेला अकोलेकरांचा थंड प्रतिसाद भेटत असला तरी त्यामागे झोननिहाय नियुक्त असलेल्या जलप्रदाय विभागातील कामचुकार कर्मचाºयांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. नळ जोडणीसंदर्भात माहिती घेण्यासाठी जाणाºया नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, ४०० रुपयांत नळ जोडणी केली जात नसल्याची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.मनपाकडून जनजागृती का नाही?अवैध किंवा नळ जोडणी वैध करून घेण्यासाठी झोन कार्यालयात जाणाºया नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. जलप्रदाय विभागामार्फत होणाºया विविध कामांवर वर्षाकाठी कोट्यवधींच्या देयकांवर उधळण केली जात आहे. अशावेळी ४०० रुपयांत नळ जोडणीसाठी झोन कार्यालयात येणाºया नागरिकांना फ्लेक्स, बॅनरद्वारे माहिती का उपलब्ध करून दिली जात नाही, असा सवाल उपस्थित होतो.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका