शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव पुरस्काराची रक्कम अजूनही अखर्चित

By admin | Updated: May 28, 2014 21:52 IST

पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मूर्तिजापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम संकल्पना आणली व पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
देशाचा विकास साधायचा असेल तर प्रथम खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, या महात्मा गांधींच्या विचाराची कास धरून राज्य शासनाने खेड्यांच्या विकासासाठी व गावातील तंटे गावातच समेटाने मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम योजना कार्यान्वित केली. या योजनेचे सर्व निकष पूर्ण करणार्‍या गावांना राज्य शासनाकडून पुरस्कारही प्रदान करण्यात आले. त्यापैकी मूर्तिजापूर तालुक्यातील पारद गावाला वर्ष २०११-१२ चा तंटामुक्त ग्राम पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारात मिळालेली रक्कम गावाच्या विकासावर खर्च करणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा निधी अखर्चितच आहे. तंटामुक्त ग्रामचा पुरस्कार तंटामुक्ती समितीला मिळत असला तरी तो निधी खर्च करण्याचा अधिकार संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीस देण्यात आला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीला हा निधी खर्च करण्याचा मुहूर्त का सापडत नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.