चोरीचा संशय पेटविली कार

By Admin | Updated: July 11, 2014 00:28 IST2014-07-11T00:28:56+5:302014-07-11T00:28:56+5:30

चोरीचा संशय घेऊन जमावाने कार पेटवून दिल्याची घटना गुरुवारी दुपारी खरप परिसरात घडली.

The suspected car of theft | चोरीचा संशय पेटविली कार

चोरीचा संशय पेटविली कार

अकोला: चोरीचा संशय घेऊन जमावाने कार पेटवून दिल्याची घटना गुरुवारी दुपारी खरप परिसरात घडली. यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. तीन युवक कारने खरप शिवारात फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी त्या युवकांना रोखून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर सदर युवकांनी दिलेल्या उत्तरांवरून ग्रामस्थांना चोरीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी कार पेटवून दिली. तसेच कारमधील तिघांना मारहाण केली. या प्रकरणी शेख नाजीर शेख महेबूब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात १0 ते १५ अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The suspected car of theft