शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

सुपर पॉवर घोटाळा, गुंतवणूकदारांना फुटला घाम !

By admin | Updated: November 22, 2014 01:36 IST

बुलडाणा जिल्ह्यातून ५ कोटीच्यावर गुंतवणुकीचा अंदाज

बुलडाणा : मुदत ठेवीवर आकर्षक परत्याचे आमिष दाखवून दोन वर्षापूर्वी सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या एजटांनी जिल्ह्यातील ेएकट्या लोणार तालुक्यातील हजारो नागरिकांकडून ५ कोटीच्यावर रक्कम जमा केल्याची भिती व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वीच सुपर पॉवर, केबीसी या इन्व्हेंस्टमेंट कंपन्याचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे दामदुप्पट रकमेच्या आमिषाने गुंतवलेली रक्कम आता मिळणारच नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याने गुंतवणुकदारांना घाम फुटला आहे. कयाच प्रकरणात औरंगाबाद गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लोणार येथून दत्तात्रय प्रभु मापारी या एजंटास अटक केल्याने सुपर पावरचे जाळे किती खोलवर आहे हे स्पष्ट झाले.सुपर पॉवर इन्व्हेंस्टमेंट कंपनीच्या संचालकांनी लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यात सेमीनार घेवून नोकरदार, व्यावसायीक, शेतमजुर, सर्वसामान्य नागरिकांना दामदुप्पट रकमेसह व्याज व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करवून घेतली. दामदुप्पट रकमेसह आकर्षक परताव्याची रक्कम पाहून तालुक्यातील शिक्षक, व्यावसायीक, शे तमजूर सर्वसामान्य नागरिकांनी व्याजाने पैसे काढून, आपल्याकडील सोने गहाण ठेवून, नातेवाईकांची मनधरणी करुन करोडो रुपये एजंटामार्फत गुंतविले. सुपर पावर मधील एजंटांना गुंतवलेल्या रकमेवर मिळणार्‍या आकर्षक कमिशनमुळे या एजंटांनी आपल्या नातेवाईकांची रक्कम गुंतवली. यामुळे ना तेवाईकांचीही फसगत झाली. सुपर पावरचे बुलडाणा जिल्ह्याचे विभागीय अधिकारी कैलास महाजन यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कंपनीचे सेमिनार घेवून यामधून गुंतवणूकदारांना कंपनीमध्ये गुंवतलेली रक्कम ९0 दिवसात दामदुप्पट, दोन ते पाच वर्षात तिप्पट दाम अधिक व्याज; अशा भुलथापा दिल्या. या भुलथा पांना बळी पडून दाम दुप्पट- तिप्पटच्या लालसेपोटी कोट्यावधी रुपयांची गुं तवणूक केली. सुरवातीचे काही महिने मोजक्याच गुंतवणूकदारांना कंपनीकडून रकमेवर मिळणार्‍या व्याजाचे स्टेट बँकेचे धनादेशही मिळाले. काही महिने व्यवहार सुरळीत चालल्यानंतर कंपनीने स्टेट बँकेतील आपले व्यवहार बंद केले. त्यानंतर दलाल ते कंपनी असे व्यवहार सुरु झाले. यातच गुंतवणूकदारांना धनादेश येणे बंद झाले. तसेच कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळालेले धनादेश बँकेमध्ये अनादरीत होत असल्याचे समजल्यावर आपली फसवणूक झाल्याचे गुं तवणूकदारांच्या लक्षात आले. बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा, लोणार, सिंदखेडराजा याठिकाणी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाली असून, औरंगाबाद पोलिस एजंटांच्या शोधात आहेत.