शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या मोटारसायकली चोरीचे प्रमाण सुसाट...

By admin | Updated: June 16, 2014 22:53 IST

दोन वर्षांमध्ये शहरातील १0५ मोटारसायकली लंपास

अकोला : गेल्या काही वर्षांपासून मोटारसायकली, कार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा चोरीला गेलेली गाडी परत मिळेल, याची काहीच शाश्वती नाही. पोलिसात तक्रार दाखल करून प्रतीक्षा करण्याशिवाय वाहनमालकाला पर्याय नसतो. पोलिस तपासही रखडल्यामुळे चोरट्यांची वाहनचोरी अगदी सुसाट सुरू आहे. गत दोन वर्षात पाचही पोलिस ठाण्यांतर्गंत एकूण १0५ मोटारसायकली लंपास झाल्या आहेत. नऊ जड वाहनेही लंपास झाली आहेत.
अकोला जिल्ह्यासह शहरामध्ये दररोज एक मोटारसायकल चोरीला जाते. एरवी हे प्रमाण खूपच वाढले आहे. एखाद्या ठिकाणी मोटारसायकल, कार उभी करणे हे जोखीम पत्करण्यासारखेच आहे. शहरामध्ये मोटारसायकल, कार चोरणार्‍या चोरट्यांची टोळीच सक्रिय आहे. शहरात दररोज कुठे ना कुठे मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविली जाते. पोलिस तक्रार नोंदवून घेतात; परंतु नंतर त्या तक्रारीचे काहीच होत नाही. महागडी मोटारसायकलचा अनेक वर्षांपर्यंत शोधच लागत नाही. अनेक लोक तर मोटारसायकल चोरीला गेली तर पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा करीत नाहीत.

** दोन वर्षांमध्ये पोलिस ठाणेनिहाय चोरीस गेलेली वाहने
सिव्हिल लाईन : १८ (मोटारसायकली), २६ सायकली
खदान : २१(मोटारसायकली), १७ सायकली, 0२ ट्रक, 0१ मिनीट्रक
रामदासपेठ : २८ मोटारसायकली, ३२ सायकली, २ ट्रक, १ ऑटोरिक्षा
आकोट फैल: १२(मोटारसायकली), १६ सायकली, 0३ट्रक, 0१ जीप
कोतवाली: २६(मोटारसायकली), 0९ सायकली, 0१ ट्रक, 0१ ऑटोरिक्षा

** व्हीडीआरविषयी जागृतीच नाही...
वैज्ञानिक युगात आधुनिक तंत्रज्ञान फार प्रगत होत आहे. चोरीस गेलेल्या गाडीचा शोध अवघ्या काही तासांमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानामुळे लागू शकतो, तो म्हणजे व्हीडीआर यंत्रणेमुळे; परंतु व्हीडीआर तंत्रज्ञानाबाबत माहिती असूनही नागरिक त्याकडे दर्लक्ष करतात. एवढेच काय, तर साध्या गॅरेजवर २00 ते ३00 रुपयांपर्यंत मिळणारे यू लॉकसुद्धा कोणी ५0 हजार रुपयांच्या मोटारसायकलवर लावायला तयार होत नाही.

** काय आहे व्हीडीआर
व्हीडीआर (व्हेईकल डाटा रेकॉर्ड) हे विमानातील ब्लॅक बॉक्ससारखेच काम करते. वाहनाच्या प्रत्येक घडामोडीची नोंद ठेवते आणि उपग्रहामार्फत सर्व्हरला हा तपशील नोंदविते. इग्निशन सुरू केले तर वाहनाची गती, वाहनाचे ठिकाण, अंतर सर्वकाही नोंदविल्या जाते. त्यामुळे अपघात, चोरी झाल्यावर मौल्यवान वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांवर देखरेखीसाठी ही यंत्रणा उपयोगी ठरते.
छाया: गाडी चोरणार्‍या चोरट्याचा फोटो वापरावा.