शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २९ हजारांवर रोहयोची कामे सुरू

By admin | Updated: May 30, 2014 01:39 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यभरात सध्या २९ हजार ७७५ कामे सुरू आहेत.

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यभरात सध्या २९ हजार ७७५ कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत व विविध यंत्रणा स्तरावरील कामांचा समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तर व यंत्रणा स्तरावर कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, नाला सरळीकरण, सिंचन विहिरी, सिमेंट बांध, ढाळीचे बांध, वृक्षारोपण, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये व इतर कामांचा समावेश आहे. मागणी प्राप्त होताच मजुरांना काम उपलब्ध करून, देण्यासाठी रोहयो अंतर्गत राज्यात एकूण ४ लाख ९० हजार ४७६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनाच्या तुलनेत गेल्या २४ मे अखेर राज्यातील सहा विभागांतर्गत ३३ जिल्ह्यांमध्ये २९ हजार ७७५ रोहयोची कामे सुरू होती. यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्तरावर २४ हजार २४८ आणि विविध यंत्रणा स्तरावर ५ हजार ५२७ कामांचा समावेश आहे. असे शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत गत २४ मे अखेरच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

**विभागनिहाय सुरू असलेली रोहयो कामे!

विभाग        कामे

कोकण          २,३३९

नाशिक         ३,७०३

पुणे             १,६१९

औरंगाबाद     ५,३३१

अमरावती     ५,९५४

नागपूर        १०,८२९

एकूण          २९,७७५

आठवडाभरात १,४२० कामांची वाढ!

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात राज्यात एकूण २८ हजार ३५५ कामे सुरू होती. २४ मे अखेर संपलेल्या आठवड्यात राज्यातील सुरू असलेल्या रोहयो कामांची संख्या २९ हजार ७७५ वर पोहोचली. म्हणजेच आठवडाभरात राज्यभरात १ हजार ४२० रोहयो कामांची वाढ झाल्याचे चित्र आहे.

विभागनिहाय कामांमध्ये नागपूर विभाग पुढे!

राज्यातील विभागनिहाय सुरू असलेल्या रोहयो कामांची आकडेवारी लक्षात घेता, रोहयो कामांमध्ये राज्यात नागपूर विभाग पुढे असल्याचे दिसत आहे. नागपूर विभागात १० हजार ८२९ कामे सुरू असून, त्याखालोखाल विदर्भातीलच अमरावती विभागात ५ हजार ९५४ कामे सुरू आहेत.