बसचे स्टेअरिंग तुटले; मोठा अनर्थ टळला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 20:20 IST2017-06-13T20:20:00+5:302017-06-13T20:20:00+5:30

चान्नी ते सस्ती मार्गावरील घटना

Stairing of bus breaks; Great disaster survived! | बसचे स्टेअरिंग तुटले; मोठा अनर्थ टळला !

बसचे स्टेअरिंग तुटले; मोठा अनर्थ टळला !

लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री (अकोला): नजीकच्या चान्नी सस्ती मार्गावरील १३ जूनच्या सकाळी ८ वाजताच्या सुमारास एस.टी. महामंडळाच्या बसचे स्टेअरिंग अचानक तुटले. परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
अकोला ते खेट्री हे बस फेरी अकोल्याहून रात्री ८.१५ वाजता निघते. ती रात्री १० वाजता खेट्री येथे पोहोचते. तेथे रात्री मुक्कामी असते. सदर बस सकाळी ६.४६ वाजता खेट्री येथून निघून चान्नी ,सस्ती , वाडेगाव मार्गे अकोला जात असते. या वहिवाटीप्रमाणे सदर बस १२ जूनच्या रात्री खेट्रीस मुक्कामी होती. ती १३ जूनच्या सकाळी ६.४६ वाजताच्या सुमारास अकोल्यास जाण्यासाठी निघाली होती. ही बस चान्नीपासून दोन किलोमिटर अंतरावरच आली असताना अचानक बसचे स्टेअरिंग तुटले. परंतु, सदर बसमधील चालकाच्या सतर्कतेमुळे बस सुरक्षितपणे रस्त्याच्या बाजुला थांबली. त्यामुळे मोठा अनर्थ टळून बसमधून प्रवास करणाऱ्या ३५ प्र्रवाशांचे जीव वाचले. या मार्गावर नेहमीच भंगार बसेस पाठविल्या जातात. त्यामुळे अनेक वेळा अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत.परंतु, भंगार बसेसमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबधितांनी दखल घेणे गरजेचे आहे.

Web Title: Stairing of bus breaks; Great disaster survived!