शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
5
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
6
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
7
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
10
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
11
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
12
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
13
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
14
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
15
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
16
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
17
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
18
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
19
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
20
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव मोहिमेवर दगडफेक

By admin | Updated: June 19, 2014 21:57 IST

अतिक्रमित बाजार हटविण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील ‘गजराज’ (जेसीबी) वर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना घडली.

अकोला : रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्या, चहाच्या टपर्‍या, भाजी विक्रेत्यांसह मच्छी व मटन विक्रेत्यांनी मांडलेला अतिक्रमित बाजार हटविण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील ह्यगजराजह्ण (जेसीबी) वर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी दुपारी आकोट फैल परिसरात घडली. दगडफेकीचा कोणताही परिणाम अतिक्रमण विभागावर न होता, रस्त्यालगतच्या अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. या प्रकरणी उत्तर विभागाचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी आकोट फैल पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रभागातील गल्लीबोळातही लघू व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत. मोठय़ा नाल्यांचे धापे, गल्लीतील चौक आदी ठिकाणी टिनाच्या टपर्‍या टाकून दुकाने उघडली आहेत. असे अतिक्रमण प्रामुख्याने ह्यस्लम एरियाह्णमध्ये झाल्याचे चित्र आहे. आकोट फैल पोलिस स्टेशन परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमित चहाची दुकाने, पानटपर्‍या, भाजी विक्रेत्यांसह मच्छी व मटन विक्रेत्यांनी बाजार मांडला आहे. आकोट फैल भागात जाणार्‍या प्रमुख रस्त्यांवरदेखील किराणा व्यावसायिक, खासगी रुग्णालयांनी टेन शेडच्या माध्यमातून अतिक्रमण थाटल्याचे चित्र आहे. यामुळे या भागात वाहनाचा धक्का लागण्यावरून अनेकदा वादावादी व हाणामारीच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. परिसरातील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता, मनपाने बुधवारी आकोट फैल पोलिस स्टेशन भागात कारवाईला सुरुवात केली. यामध्ये साधना चौक, आंबेडकर चौक, पूरपीडित कॉलनी, मनपा शाळा क्र.१८, मच्छी मार्केट, मटन मार्केट आदी भागातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. दुपारी काही अतिक्रमणधारकांना स्वत:हून अतिक्रमण काढण्याची मुभा दिल्यानंतर अतिक्रमण पथकातील कर्मचारी चहा घेण्यासाठी दुकानात आले. ही वेळ साधत काही समाजकंटकांनी ह्यगजराजह्णवर दगडफेक करीत हेड लाईट फोडले. या प्रकारानंतरही पथकाने कारवाई न थांबवता, परिसरातील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. कारवाई उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे, प्रवीण मिश्रा, विजय बडोणे, संजय थोरात व सुरक्षा कर्मचार्‍यांनी पार पाडली.