शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शहरालगतच्या अनधिकृत बांधकामांची लवकरच तपासणी

By admin | Updated: May 16, 2015 00:55 IST

तहसील स्तरावर ‘तपासणी फॉर्म’ वितरित.

अकोला: जिल्ह्यातील शहरालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत झालेली बांधकामे तसेच अनधिकृत बांधकामांची तपासणी लवकरच महसूल विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. या तपासणीत बांधकामांची माहिती नोंदविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील स्तरावर ह्यत पासणी फॉर्मह्ण १२ मे रोजी वितरित करण्यात आले. २३ एप्रिल २0१२ च्या शासन निर्णयान्वये अकोला-वाशिम प्रादेशिक योजना मंजूर करण्यात आली असून, १५ जून २0१२ पासून ही योजना अंमलात आली. या प्रादेशिक योजनेकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १८ नुसार जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून जिल्हाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या या आदेशानुसार महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अकोला महानगर पालिका व जिल्हय़ातील नगरपालिका क्षेत्रालगत गावातील बांधकामांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी आवश्यक आहे. या पृष्ठभूमीवर १५ जून २0१२ ते २७ एप्रिल २0१५ या कालावधीत जिल्ह्यातील शहरालगतच्या ४0 गावांमध्ये करण्यात आलेली बांधकामे तसेच अनधिकृत बांधकामांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी २७ एप्रिल रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर, तेल्हारा व आकोट इत्यादी सहा शहरानजिकच्या ४0 गावांमध्ये करण्यात आलेली बांधकामे व त्यामध्ये अनधिकृत करण्यात आलेली बांधकामे यासंदर्भात तपासणीचे काम लवकरच महसूल विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.