शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात थाटली जाताहेत दुकाने

By admin | Updated: November 10, 2014 01:21 IST

अकोला शहरातील वास्तव, वाहतुकीची कोंडी : किराणा बाजारातील व्यावसायिक त्रस्त.

अकोला : किराणा बाजारात भररस्त्यातच किरकोळ नवीन आणि जुन्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटल्या जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच रस्त्यावरच दुकाने थाटण्यात येत असल्याने किराणा बाजारातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. किराणा-कोठडी बाजारात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बाजारात विदर्भातील व्यापारीही येतात. मात्र, बाजारात रविवारी रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांवर नवीन आणि जुन्या साहित्याच्या विक्रीची दुकाने थाटण्यात येतात. ही दुकाने किराणा व्यावसायिकांच्या दुकानांसमारेच थाटण्यात येतात. काही जण तर रस्त्यावरच दुकाने थाटतात. त्यामुळे कॉटन मार्केट पोलिस चौकीकडून कोठारी बाजार आणि कापड बाजार चौकाकडून ताजनापेठ चौकाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनेक वेळा वाहन चालकांमध्ये वाद होतात. काही वेळा तर वादाचे पर्यवसान हाणमारीतही होते. रस्त्यावर दुकाने थाटण्यात येऊ नये, यावर पोलिस आणि महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किराणा व्यावसायिकांमधून होत आहे. *या वस्तूंची होते विक्रीकिराणा बाजारात भररस्त्यातच रविवारी सकाळीच हातगाडीवर दुकाने थाटण्यात येतात. या ठिकाणी चप्पल-बूट, तयार कपडे, जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लहान मुलांची जुनी खेळणी व गृहोपयोगी वस्तूंची विक्री करण्यात येते. *असामाजिक तत्त्वांचा वावर किराणा बाजारात भररस्त्यावरच साहित्याची विक्री होते. या ठिकाणी चोरटे सक्रिय असतात. वस्तू खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांच्या खिशांवर चोरटे हात साफ करतात. तसेच काही वेळा किराणा दुकानांमध्येही चोरीचा प्रयत्न होतो.