शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

..तर मनपा बरखास्तीचा प्रस्ताव पाठवा!

By admin | Updated: November 24, 2014 01:36 IST

महसूल मंत्र्यांचे अकोला जिल्हाधिका-यांना निर्देश; पाणी आरक्षणाचे पैसे भरावेच लागतील.

अकोला: पाणी आरक्षणाचे पैसे लागतील असे सांगत, केवळ शासनावर अवलंबून न राहता, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली जबाबादारी पार पाडली पाहिजे, नाही तर महानगरपालिका बरखास् तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा, असे निर्देश महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी जिल्हाधिकार्‍यांना दिले.अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात टंचाई परिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महान येथे नवीन पंप बसविण्याची मागणी महापौर उज्ज्वला देशमुख यांनी या बैठकीत केली. तसेच शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी निधीची मागणीदेखील त्यांनी महसूल मंत्र्यांकडे केली. सुजल योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पंप दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन महसूल मंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, पाणीपुरवठा योजनांच्या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी महसूल मंत्र्यांना माहिती दिली. पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षणाचे पैसे माफ करण्याबाबत मनपा, नगरपालिकांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले असता, टंचाईसंदर्भात शासनाची सहानुभूती असली तरी, प्रत्येक बाबीसाठी शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पाणी आरक्षणाचे पैसे भरावेच लागतील, अन्यथा मनपा बरखास्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा, असे निर्देश खडसे यांनी जिल्हाधिकार्‍यांना यावेळी दिले.