आपातापा व आखतवाडा येथून दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST2021-01-18T04:16:47+5:302021-01-18T04:16:47+5:30

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आखतवाडा व आपातापा येथे रविवारी देशी व विदेशी दारुची अवैधरित्या विक्री सुरु ...

Seizure of liquor from Apatapa and Akhatwada | आपातापा व आखतवाडा येथून दारुसाठा जप्त

आपातापा व आखतवाडा येथून दारुसाठा जप्त

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आखतवाडा व आपातापा येथे रविवारी देशी व विदेशी दारुची अवैधरित्या विक्री सुरु असताना दहशतवादविराेधी पथकाने छापा टाकून दाेघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ हजारांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.

आखतवाडा येथील रामगीर अवधुतगीर याच्या घरात देशी व विदेशी दारुचा साठा असल्याची माहिती दहशतवादविराेधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी पथकासह छापा टाकून १० हजारांचा दारुसाठा जप्त केला. त्यानंतर आपातापा येथील भरत बाेबटे याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक हजार रुपयांची दारु जप्त केली. दहशतवादविराेधी पथकाने एकूण ११ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला असून, या दाेघांविरुध्द आकाेट फैल पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच अश्विन भरत बोबट्ये याच्याजवळ आपाताफ़ा गावातील पाण्याच्या टाकीखाली ९०० रुपयांची १५ क्वार्टर्स देशी दारू विनापरवाना सापडल्याने दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Seizure of liquor from Apatapa and Akhatwada