शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचे भाव अचानक वाढले!

By admin | Updated: July 21, 2014 00:17 IST

सोयाबीन बियाण्यांच्या भावात अचानक वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.

अकोला : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची बाजारात लगबग सुरू झाली असून, अशा स्थितीत सोयाबीन बियाण्यांच्या भावात अचानक वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या धावपळीत बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने कापूस बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांना सजग रहावे लागणार आहे. या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढत असून, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ५५ हजार ९५३ क्विंटल सोयाबीन तर ४ लाख ३३ हजार बीटी कापसाची पाकिटं खरेदी केली आहेत. यामध्ये आणखी वाढ झाली आहे. सध्या बाजारात कापूस बियाण्यांची मागणी वाढली आहे; परंतु अनेक नामवंत कंपन्यांचे बाजारातील बियाणे संपले आहे. त्यामुळे शेतकरी मिळेल ते कापसाचे बियाणे खरेदी करीत आहेत. या धावपळीत आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाण शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असून, काही प्रमाणात हे बियाणे विकले गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सोयाबीनचे ३0 किलो गोणीचे दर आठ दिवसापूर्वी २३00 रुपये होते ते आता २४५0 रुपये करण्यात आले आहेत. सोबतच इतर बियाण्यांचे भावदेखील वाढले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी लागणार असून, खबरदारी म्हणून बियाणे खरेदीची पावतीही शेतकर्‍यांनी घेणे आवश्यक आहे.