अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याची बाजी

By Admin | Updated: June 18, 2014 01:13 IST2014-06-18T01:11:28+5:302014-06-18T01:13:42+5:30

जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सर्वाधिक ८५.0७ टक्के विद्यार्थी पातूर तालुक्यातील उत्तीर्ण झाले आहेत.

Satur taluka wins in Akola district | अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याची बाजी

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याची बाजी

अकोला : दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातून नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमांचे २६,६३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २१,५0५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती विभागामध्ये सर्वात कमी निकाल अकोला जिल्ह्याचा लागला आहे. त्यातही जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये सर्वाधिक ८५.0७ टक्के विद्यार्थी पातूर तालुक्यातील उत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ बार्शिटाकळी तालुक्याचा निकाल ८२.७९ टक्के लागला आहे. अकोला तालुक्यात ८२.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मूर्तिजापूर ८१.८१, आकोट ७९.४७, बाळापूर ७६.९२ आणि तेल्हारा तालुक्यात ७६.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वच तालुक्यात मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍या मुलींचे प्रमाण अधिक आहे

Web Title: Satur taluka wins in Akola district