शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १४ हजार नळ कनेक्शनची उलट तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:43 IST

आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण १४ हजार नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत.

- आशिष गावंडेअकोला: केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकणाºया ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीने १४ हजार नळ जोडणी केल्याची माहिती आहे. शौचालय घोळाच्या पृष्ठभूमीवर महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी संपूर्ण १४ हजार नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जलप्रदाय विभागाला दिले आहेत. आयुक्तांच्या भूमिकेमुळे संबंधित कंपनीसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ अभियानाच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याचे काम केले जात आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. या दोन्ही योजनांचा आवाका लक्षात घेता त्यावर देखरेख ठेवणाºया मजीप्राची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी तत्कालीन राज्य शासनाने ११० कोटी मंजूर केले होते. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. चार टक्के जादा दराने निविदा सादर करणाºया ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला कंत्राट देण्यात आला. कंत्राटदाराकडून मुख्य रस्ते व रस्त्यालगतचा भाग खोदून शहराच्या कानाकोपºयात जलवाहिनी टाकली जात आहे. यादरम्यान, मजीप्राने सुचविल्याप्रमाणे जलवाहिनीचे जाळे टाकताना नळ जोडणीचा कंत्राटही याच कं त्राटदाराला देण्यात आला. आजपर्यंत १४ हजार नळ जोडणी करण्यात आल्याची माहिती आहे.नळ जोडणीची उलट तपासणी का?कंत्राटदाराने १४ हजार नळ जोडणी केली. प्रतिलाभार्थी ४ हजार २०० रुपये किंवा ३ हजार ७०० रुपयांचे देयक गृहीत धरल्यास मनपाने सरासरी पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा केल्याची माहिती आहे. शौचालयांचा घोळ समोर येताच भविष्यात नळ जोडणीच्या मुद्यावर तांत्रिक अडचण नको, या उद्देशातून प्रशासनाने नळ जोडणीची उलट तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलल्या जात आहे.जलप्रदाय विभागाला नळ जोडणीच्या उलट तपासणीचे निर्देश दिले असून, प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन तशी नोंद घेतली जाणार आहे. त्यामध्ये काही तफावत निघाल्यास नियमाप्रमाणे पुढील निर्णय घेता येईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका