शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

साठय़ात काळा बाजाराची पाळेमुळे

By admin | Updated: October 17, 2016 02:51 IST

लोहारा येथील साठा पोषण आहाराचा की पुरवठा विभागाचा.

अकोला, दि. १६- तांदळाचा काळा बाजार करणार्‍या माफियांचे जिल्हय़ात सर्वत्र जाळेच असल्याचे लोहारा येथे आढळलेल्या साठय़ामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जप्त केलेला १८३ क्विंटल तांदूळ शालेय पोषण आहाराचा की शिधापत्रिकाधारकांचा यावरून पुरवठा विभागाच्या कारवाईचा गोंधळ झाला आहे. त्यामुळे याबाबत बाळापूरचे नायब तहसीलदार सुरेश किर्दक यांनी उरळ पोलिसांत तक्रार केली आहे. जिल्हय़ाच्या आकोट व तेल्हारा तालुक्यांतून स्वस्त धान्याचा मोठय़ा प्रमाणात अपहार झाल्याच्या घटना लगतच्या काळात उघड झाल्या आहेत. त्याशिवाय, पातूर तालुक्यातील आलेगाव व खेट्री या गावांतही पोषण आहाराच्या तांदळाचा मोठय़ा प्रमाणात साठा करून मेहकर तालुक्यातील माफियांना विकला जातो. तेथेही माफियांवर कारवाई झाली आहे. तांदळाच्या अवैध साठय़ाच्या घटना पाहता त्यामध्ये शालेय पोषण आहार आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या योजनांचा तांदूळ असतो; मात्र तांदूळ नेमका कोणाचा, हे तत्काळ ठरविता येत नाही. त्यामुळेच लोहारा येथे आढळून आलेल्या तांदळाबाबत ही बाब प्रथमदर्शनी स्पष्ट होत नाही. त्यामुळे आरोपी सुशीलकुमार सिंघेल याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास रेशन माफियांचे जाळेच उघड होण्याची शक्यता आहे. शेगाव, तेल्हारा तालुक्यांतील तांदूळजप्त केलेला तांदूळ हा शासकीय योजनांचा असल्याचा पुरवठा विभागाचा विश्‍वास आहे. शालेय पोषण आहार, सार्वजनिक वितरण प्रणालीचा हा तांदूळ बाळापूरसह लगतच्या शेगाव, तेल्हारा तालुक्यांतून जमा केलेला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातील तथ्य आता पोलिसांना पुढे आणावे लागणार आहे. तालुक्याच्या उपकंत्राटामुळे काळा बाजारशालेय पोषण आहाराचा तांदूळ हा तालुकानिहाय उपकंत्राटदारामार्फत पुरविला जातो. त्यापैकी काहींनी कंत्राटाच्या आड तांदळाचा काळा बाजार करण्याचा धंदाच सुरू केलेला आहे. सोबतच जिल्हय़ातील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडूनही तांदळाचा काळा बाजार होतो. त्या सर्वांचा तांदूळ एकत्र करून योग्यवेळी विल्हेवाट लावली जाते. त्यांच्यावर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली; मात्र नंतर त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.