शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका-आधार ‘लिंक’ची पडताळणी सुरू !

By admin | Updated: June 17, 2017 01:31 IST

‘ई-पॉस’ द्वारे १ जुलैपासून होणार धान्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १ जुलैपासून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या शिधापत्रिकांच्या पडताळणीचे काम अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत सुरू आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना दरमहा स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्य वितरीत करण्यात येते. शासनाच्या पुरवठा विभागाच्या निर्णयानुसार १ जुलैपासून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘ई-पॉस ’ मशीनद्वारे स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिका क्रमांक आधार क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) असणे आवश्यक आहे. त्यानुसार शिधापत्रिका आधारक्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम ८५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, १ जुलैपासून पासून ‘ई-पॉस ’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करावयाचे असल्याच्या पृष्ठभूमीवर आधार क्रमांकाशी ‘लिंक’करण्यात आलेल्या शिधापत्रिका, शिधापत्रिकामधील समाविष्ट लाभार्थींचा आधार क्रमांक, शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणाचा लाभ, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय योजना या योजनांपैकी शिधापत्रिकाधारकांचा कोणत्या योजनेत समावेश आहे, यासंदर्भात माहिती पडताळणीचे काम पुरवठा विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सुरू आहे.शासनाच्या आदेशानुसार १ जुलैपासून ‘ई-पॉस’ मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आधार क्रमांकाशी ‘लिंक ’ करण्यात आलेल्या शिधापत्रिका, त्यामधील त्रुटी, योजनानिहाय लाभार्थी शिधापत्रिकाधारकांचा समावेश यासंदर्भात पडताळणीचे काम सध्या सुरू आहे.-अनिल टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.