पावसाने ओलांडली सरासरी

By Admin | Updated: June 20, 2015 02:45 IST2015-06-20T02:45:28+5:302015-06-20T02:45:28+5:30

अकोला जिल्ह्यात कोसळला १२९ मिमी पाऊस.

Rain exceeds the average | पावसाने ओलांडली सरासरी

पावसाने ओलांडली सरासरी

अकोला : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, हवामान खात्याने आगामी ७२ तासांत अतवृष्टीचा इशारा दिला आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाला उशिरा प्रारंभ झाला असला, तरी १९ जूनपर्यंंत पावसाने सरासरी ओलांडली असून, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गुरुवारी नागपूरच्या हवामान खात्याने जिल्ह्यात आगामी ७२ तास अतवृष्टीचा इशारा दिला. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार १९ जूनपर्यंंत पावसाने जिल्ह्यात सरासरी ओलांडली. १९ जूनपर्यंंत जिल्ह्यात ८५. ६४ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र, १२९.0 मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६९५ मिमी असून, वार्षिक सरासरीच्या १८.५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

Web Title: Rain exceeds the average