कालवाडी येथील जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST2021-04-11T04:18:03+5:302021-04-11T04:18:03+5:30

अकोला : अकोट तालुक्यातील कालवाडी येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष ...

Raid on gambling den at Kalwadi | कालवाडी येथील जुगार अड्ड्यावर धाड

कालवाडी येथील जुगार अड्ड्यावर धाड

अकोला : अकोट तालुक्यातील कालवाडी येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून चार जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालवाडी येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी छापा टाकून कैलास तुळशीराम पळसकार राहणार अकोट, प्रतीक प्रमोद सांगूनवेडे राहणार अकोट, हिंमत रमेश छापरवाल राहणार अकोट व विनायक प्रल्हाद तळोकार राहणार लाडेगाव अकोट या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on gambling den at Kalwadi