शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाचे प्रस्ताव; आज मुंबईत बैठक

By admin | Updated: January 3, 2015 01:25 IST

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष.

अकोला : महापालिकेच्या रखडलेल्या प्रस्तावांमुळे शहराचा विकास ठप्प पडून आहे. प्रशासन व पदाधिकार्‍यांच्या समन्वयाअभावी ही स्थिती कायम आहे. असे रखडलेले प्रस्ताव निकाली काढण्यासाठी नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला असून, यासंदर्भात ३ जानेवारी रोजी मनपा अधिकार्‍यांची मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.महापालिकेसह राज्य व केंद्रात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. जिल्ह्यात सुद्धा भाजपचे राजकीय वर्चस्व आहे. अशास्थितीत मागील सात वर्षांपासून शहराच्या ठप्प पडलेल्या विकासाची गाडी रुळावर येईल, अशी सर्वसामान्य अकोलेकरांना अपेक्षा आहे; परंतु मनपात सत्ताधारी व अधिकार्‍यांमधून विस्तवही जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशास्थितीत शहराचा विकास होईल किंवा नाही, या संभ्रमावस्थेत अकोलेकर आहेत. विकासाचे अनेक प्रस्ताव मनपात पडून आहेत. स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू नसल्यामुळे बांधकाम व्यवसायाला खिळ बसली आहे. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पाचपैकी चार पम्प कालबाह्य झाल्याने त्यामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासह विविध महत्त्वपूर्ण प्रस्ताव पाठपुराव्याअभावी मनपात पडून आहेत. असे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला. सुजल निर्मल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारणा कार्यक्रम राबवण्यासाठी मनपाने ४ कोटी ७३ लाखांचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव अधांतरी आहे. ह्यडीसीह्णरूलसह प्रलंबित प्रस्तावांवर उद्या ३ जानेवारीला पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.