अग्रणी रक्कम जमा करण्यासाठी इंदिरा रुग्णालयाकडून रुग्णाच्या नातेवाइकावर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:10+5:302021-04-20T04:20:10+5:30

न्याय देण्याची मागणी माझ्या वडिलांना भरती करून एक तासही हाेत नाही ताेच डाॅक्टरांकडून आम्हाला पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात ...

Pressure on the patient's relatives from Indira Hospital to deposit the leading amount | अग्रणी रक्कम जमा करण्यासाठी इंदिरा रुग्णालयाकडून रुग्णाच्या नातेवाइकावर दबाव

अग्रणी रक्कम जमा करण्यासाठी इंदिरा रुग्णालयाकडून रुग्णाच्या नातेवाइकावर दबाव

न्याय देण्याची मागणी

माझ्या वडिलांना भरती करून एक तासही हाेत नाही ताेच डाॅक्टरांकडून आम्हाला पैशांसाठी त्रास देण्यास सुरुवात झाली, असा आराेप मुलाने उजजिल्हधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे रुग्णांना हाॅस्पिटलमधून सुटी हाेताना किती रुपयांचे देयक हातात पडेल, याची कल्पनाही न केलेली बरी. याप्रकरणी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी रुग्णाच्या मुलाने केली आहे.

बाळापूर तालुक्यातील संबंधित रुग्ण सकाळी भरती झाला. रुग्णाच्या नातेवाइकांना शासन नियमानुसार उपचारासाठीचा खर्च सांगितला. त्यांनी १० हजार रुपये जमा केले आणि १५ हजार रुपये १०-१५ मिनिटांत जमा करताे, असेही सांगितले. मात्र, अडीच-तीन तासांनंतरही १५ हजार रुपये संबंधितांकडून जमा न झाल्याने आम्ही पाठपुरावा केला. तक्रारीत केलेले आरोप निराधार व चुकीचे आहेत.

– डाॅ. चंदन माेटवानी, इंदिरा हाॅस्पिटल.

Web Title: Pressure on the patient's relatives from Indira Hospital to deposit the leading amount