शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमिगत’चा ठराव शासनाकडे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:19 IST

अकोला : भूमिगत गटार योजनेच्या निविदेला स्थायी समितीने २२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर निविदेचा ठराव गुरुवारी शासनाकडे सादर करण्यात आला. स्थायी समितीकडून हा ठराव प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाला होता. नगर विकास विभागाच्या मंजुरीनंतर संबंधित कंपनीला कार्यादेश देण्याचा मार्ग मोकळा होईल. 

ठळक मुद्देशासनाच्या मंजुरीनंतर मिळणार कार्यादेश३७ एमएलडीच्या दोन प्लान्टची उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भूमिगत गटार योजनेच्या निविदेला स्थायी समितीने २२ सप्टेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर निविदेचा ठराव गुरुवारी शासनाकडे सादर करण्यात आला. स्थायी समितीकडून हा ठराव प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाला होता. नगर विकास विभागाच्या मंजुरीनंतर संबंधित कंपनीला कार्यादेश देण्याचा मार्ग मोकळा होईल. शहरातील घाण सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नदी दूषित झाली आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत भूमिगत गटार योजनेचा समावेश आहे. शासनाने भूमिगत गटार योजनेंतर्गत ३0 आणि सात एमएलडी असे दोन प्लान्ट उभारण्यासाठी ७९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी मनपाने ६१ कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रकाशित केली होती. ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनी ठाणे यांच्यावतीने ८.९ टक्के जादा दराची निविदा तसेच विश्‍वराज इन्फ्रा कंपनी नागपूरच्यावतीने ७२ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली होती. प्रशासनाने ईगल कंपनीची निविदा मंजूर करीत अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केली. १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत ‘डीपीआर’मध्ये त्रुटी असल्यामुळे ही निविदा रद्द करून फेरनिविदा बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निविदेला ३0 सप्टेंबरपर्यंत कार्यादेश न दिल्यास निधी इतरत्र वळती करण्याचे पत्र राज्य शासनाने जारी केले होते. त्या पृष्ठभूमीवर २२ सप्टेंबर  रोजी स्थायी समिती सभेने ईगल इन्फ्रा लिमिटेड कंपनीच्या निविदेला मंजुरी दिली. हा ठराव बुधवारी प्रशासनाला प्राप्त झाला. प्रशासनाने गुरुवारी नगर विकास विभागात ठराव सादर केला. नगर विकास विभागाच्या मंजुरीनंतर मनपाकडून कार्यादेश दिले जातील.