गवळीपुऱ्यातील युवकांकडून भांडे व्यापाऱ्यास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:18 IST2021-04-08T04:18:48+5:302021-04-08T04:18:48+5:30

रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोडवर असलेल्या अलंकार मार्केटमधील एका भांडे व्यापाऱ्याच्या दुकानासमोर ...

Potter trader beaten to death by youths in Gawalipur | गवळीपुऱ्यातील युवकांकडून भांडे व्यापाऱ्यास बेदम मारहाण

गवळीपुऱ्यातील युवकांकडून भांडे व्यापाऱ्यास बेदम मारहाण

रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळक रोडवर असलेल्या अलंकार मार्केटमधील एका भांडे व्यापाऱ्याच्या दुकानासमोर बांधकाम साहित्य टाकून त्या व्यापाऱ्यास गवळीपुरा परिसरातील युवकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जखमी व्यापाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अलंकार मार्केटमधील भांडे व्यापारी संतोष कळमशेरे यांच्या दुकानासमोर गवळीपुरा परिसरातील काही युवकांनी बांधकामाचे साहित्य टाकले. त्यामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना रस्ता नसल्याने भांडे व्यापारी संतोष कळमशेरे यांनी युवकांना हटकले असता या युवकांनी व्यापाऱ्यास बेदम मारहाण केली. त्यानंतर व्यापारी या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याकडे जात असताना या युवकांनी पाठलाग करून एका चौकात अडवून पुन्हा यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या मारेकऱ्यांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Potter trader beaten to death by youths in Gawalipur