शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका हद्दवाढीचे सकारात्मक संकेत

By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST

महापालिका हद्दवाढीच्या मुद्यावर राज्य शासनाने पुन्हा सकारात्मक संकेत दिले आहेत.

अकोला : महापालिका हद्दवाढीच्या मुद्यावर राज्य शासनाने पुन्हा सकारात्मक संकेत दिले आहेत. महापालिका क्षेत्रात समाविष्ट होणार्‍या संभाव्य व प्रस्तावित गावांची माहिती सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. त्या स्वरूपाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अकोला शहराची लोकसंख्या व र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे गरजेचे झाले आहे. मनपाच्यावतीने पुरविल्या जाणार्‍या मूलभूत सोयी-सुविधांवर शहरालगतच्या गावांचा ताण पडत आहे. रस्ते, पथदिवे, पाणी आदी सुविधांचा लाभ शहरालगतचे नागरिक घेत आहेत. शिवाय शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ व जमिनींचे आकाशाला भिडलेले दर पाहता, मनपाची हद्दवाढ आवश्यक आहे. या विषयावर आजपर्यंंत आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी किमान सात ते आठ वेळा अधिवेशनात लक्षवेधीद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी अकोला जिल्हय़ातील बाळापूर नगर परिषदेची हद्दवाढ झाली असून, मनपा हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हा अहवाल प्राप्त होताच त्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट उत्तर मुख्यमंत्र्यांनी आ. बाजोरिया यांना दिले होते. या अधिवेशनात आ. बाजोरिया यांनी प्रश्न उपस्थित करीत शासनाला पुन्हा जाणीव करून दिली. बाजोरियांच्या प्रश्नावर शासनाने अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील शहरांच्या हद्दवाढीसंदर्भात संबंधित जिल्हा प्रशासनाला व मनपाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मनपाने पाठवलेल्या प्रस्तावावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.