शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या केलेले पोलीस कर्मचारी मूळ पोलीस ठाण्यातच!

By admin | Updated: July 17, 2017 03:09 IST

पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनाही तत्काळ सोडण्याचे आदेश शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रमजान ईद उत्सव सण संपल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करीत त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते; परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुन्हे तपासाची कामे असल्यामुळे संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्यांना मूळ ठाण्यातूनच कार्यमुक्त केले नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असतानाही ठाणेदार त्यांना सोडत नसल्यामुळे त्यांना मूळ पोलीस ठाण्यातच काम करावे लागत आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस ठाण्यातून मुक्त केले का, याबाबत आढावा नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात येत आहे; परंतु काही पोलीस ठाण्यांमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार सोडत नसल्याची ओरड अनेक कर्मचारी करीत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांना लगेच कार्यमुक्त करून बदली केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते. गुन्हे आढावा बैठकीतसुद्धा ठाणेदारांना बदलीवरील कर्मचाऱ्यांना सोडण्यास बजावले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करू. - राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.