शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रंग उधळा... पण, जरा जपून : रासायनिक रंगांपासून सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 16:35 IST

पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एका दिवसावर धुलिवंदनाचा सण येऊन ठेपला असून, विविध रंग आणि पिचकाºयांनी बाजारपेठ सजली आहे. दुसरीकडे रासायनिक रंगांचे मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याने, पर्यावरणपुरक रंगांची उधळून करून धुलिवंदनाचा आनंद लुटा, असे आवाहन आरोग्य विभाग, पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने करण्यात आले.दरवर्षी जिल्ह्यात होळी व धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या उत्सवात रासायनिक रंगांमुळे त्वचा व शरिराला बाधा पोहोचू नये म्हणून विविध शाळांचे हरीत सेना पथकाने तसेच आरोग्य विभागाने पर्यावरणपुरक रंग उधळण्याबाबत जनजागृती केली तसेच हरीत सेना पथकाने नैसर्गिक रंग बनविण्याचा पद्धतीची माहितीदेखील दिली. धुळवडीच्या वेळेस वापरण्यात येणारे रासायनिक रंग मानवी व पर्यावरणीय आरोग्यासाठी घातक आहे. रासायनिक रंगामुळे आरोग्यावर विपरित होऊ शकतात, असे त्वचारोग तज्ज्ञांनी सांगितले. नैसर्गिक रंग बनविण्याच्या पद्धतीही एसएमसीच्या स्कूलच्या प्राचार्या मीना उबगडे व शिक्षक अभिजित जोशी यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. रासायनिक रंग चेहºयावर विपरित परिणाम करतात. रंगाचा काही अंश डोळ्यात गेला तर अंधत्त्व येण्याचा धोकाही असतो. मानवी आरोग्यावरील संभाव्य परिणाम टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. अनिल कावरखे जोशी यांनी केले. दरम्यान, ८ मार्च रोजी रविवारी होळी व धुलिवंदनानिमित्त वाशिमची बाजारपेठ विविध प्रकारच्या दुकानांनी फुलून गेली होती.  नैसर्गिक रंग बनविण्याच्या पध्दती जांभळा रंग - बिट या खाद्य फळाचा टाकावू सालापासून किंवा गरापासुन आकर्षक जांभळा रंग बनविता येतो. साल किंवा गर पाण्यात टाकून ढवळले असता जांभळा रंग तयार होतो. पिवळा रंग - बेलफळाची साल पाण्यात टाकून उकळल्यास आकर्षक पिवळा रंग तयार होतो. एक भाग हळद दोन भाग कोणतेही पीठ यांचे मिश्रण पाण्यात टाकून ढवळले असता आकर्षक पिवळा रंग तयार होतो. काळा रंग - आवळा फळाचा किस लोखंडी तव्यावर टाकून त्यात पाणी टाकून उकळले असता गडद काळा रंग तयार होते.नारिंगी रंग - बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळला असता नारिंगी रंग तयार होतो. लाल रंग - जास्वंद, पळस किंवा गुलाब फुलांचा कुटून लगदा करावा हा लगदा पाण्यात टाकून ढवळला असता आकर्षक लाल रंग तयार होतो. हिरवा रंग - गहू, ज्वारी, पालक किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून लगदा करावा. हा लगदा पाण्यात टाकुन ढवळला असता आकर्षक असा हिरवा रंग प्राप्त होतो.   रासायनिक रंगामुळे त्वचारोग जडू शकतात. त्यामुळे रासायनिक रंग टाळून धुलिवंदनाचा उत्सव साजरा करावा.-डॉ. अनिल कावरखेजिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHoliहोळी