शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका अभियंत्यांना सरकारी अभियंत्यांएवढे वेतन द्या

By admin | Updated: November 22, 2014 00:56 IST

उच्च न्यायालय : तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश.

खामगाव (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अभियंत्यांच्या तुलनेने कामाचा ताण जास्त आणि वेतन कमी अशी परिस्थिती असलेल्या नगर पालिका अभियंत्यांना राज्य शासनाच्या अभियंत्यांएवढे वेतन देण्यासाठी तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. समान अभियांत्रिकी शिक्षण, कामाचे समान स्वरूप, वाढत्या शहरीकरणामुळे विविध योजना व सुविधांची वाढत असलेली व्याप्ती पाहता नगरपालिका अभियं त्यांना विविध तांत्रिक जबाबदार्‍यांसह जनसंपर्क, व्यवस्थापन आदी जबाबदार्‍याही पार पाडाव्या लागतात. वेतन मात्र राज्य शासनाच्या इतर विभागा तील अभियंत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. महाराष्ट्र राज्य नगर परिषद अभियंता संघाने तीन वर्षांंपूर्वी नगर विकास विभागाच्या संचालकांना हा अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, नगरपालिका प्रशासन संचालकांनी अभियंत्यांच्या मागण्या रास्त असल्याचा प्रस्ताव विविध संदर्भासह नगर विकास विभागाकडे दोन वर्षांंपूर्वी सादर केला होता. हा प्रस्तावही राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे अभियंता संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनूप मोह ता, एन.एम.जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. नगरपरिषद अभियंता संघाचे उपाध्यक्ष संजय मोकासरे यांनी नगर पालिका अभियंत्यांवरील अन्यायाची न्यायालयाने दखल घेतली असल्याचे सांगुन राज्य सरकारी अभियंत्यांप्रमाणे समान वेतनश्रेणी मिळावी, ही रास्त मागणी असल्याचे स् पष्ट केले आहे. यामुळे राज्यातील २३४ नगरपालिकांमध्ये कार्यरत अभियंत्यांना समान वेतनवाढीबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.