शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव जनजागृती व ग्रामविकास सप्ताहात पश्‍चिम व-हाडातील पाच गावांचा सहभाग

By admin | Updated: May 30, 2015 01:56 IST

लोकसहभागातून विविध कार्यक्रम.

प्रफुल बानगावकर / कारंजा लाड (वाशिम): आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी राज्यातील ६६ आदर्श गावांमध्ये आदर्श गाव जनजागृती व ग्रामविकास सप्ताह लोकसहभागातून साजरा करण्याच्या सूचना निवडलेल्या संस्था अध्यक्ष व सरपंच, गाव समिती अध्यक्ष यांना देण्यत आल्या आहेत. यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातील ५ गावांचा समावेश असून,यात वाशिम व बुलढाणा प्रत्येकी दोन तर अकोला जिल्हयातील एका गावाचा सहभाग आहे. कृषी विभागाच्यावतीने आदर्श गाव सकंल्प व प्रकल्प समिती पूणे यांच्यावतीने आदर्श गाव योजना ही खेड्याच्या विकासाला नवा आकार व नवी दिशा देणारी महाराष्ट शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या गावांनी पाणलोट विकास, कृषी विकास व सामाजिक विकासाच्या विविध अंगामध्ये अत्यंत भरीव प्रगती केली आहे. त्यामुळे गतवर्र्षी निवडलेल्या ६६ गावात कृषी, पाणलोट विकास, पर्यावरण संवर्धन, सामाजिक विकास व तत्सम बाबीबाबत ग्रामस्थामध्ये जागृती होण्याच्या दुष्टीने आणि गावांत सामुहीक उपक्रमशिलता वृध्दिंगत होण्यासाठी ५ जून रोजी जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून १ ते ७ जून २0१५ या कालावधीत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून पश्‍चिम वर्‍हाडातील वाशिम जिल्हयातील साखरा व धोत्रा जहाँगीर, बुलढाणा जिल्हयातील खोर व वकाना तर अकोला जिल्हयातील कपिलेश्‍वर या गावाचा समावेश आहे. या सप्ताहात १ जून रोजी पूर्व हंगामी मृदसंधारण कामांची देखभाल व दुरूस्ती याअंतर्गत गावातील महत्वाचे सामुहिक तसेच वैयक्तिक मृद संधारण उपचारांच्या कामांची देखभाल, २ जून रोजी शिक्षण सत्नाची सुरूवात, व्यवस्था माहिती व दाखल्याचे वाटप, ३ जून रोजी आरोग्य शिबिर महिला व बालकांचे आरोग्य, तपासणी व मार्गर्शन शिबिर, दि. ४ जून रोजी ग्राम विकासाचे विविध अभियान जनजागृती चर्चासत्न, दि. ५ जून जागतीक पर्यावरण दिन वृक्ष लागवड उपक्रम, दि. ६ जून रोजी गावाचे सुशोभीकरण, दि. ७ जून रोजी पाण्याच्या ताळेबंदावर आधारीत पीक पध्दती, बियाणे उपलब्धता इ.विषयावर चर्चासत्न आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन व सप्ताह समाप्ती उपक्रम आदी कार्यक्रम या सप्ताहात लोकसहभागातून होणार आहे. या अभियानाकरीता तालुका अंतर्गत येणारे कृषी अधिकारी, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, शिक्षण विभाग आदीचे सहकार्य घेण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहीती आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीे दिली.