शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

आता मरणही होईल सुकर...

By admin | Updated: June 12, 2014 19:13 IST

स्मशानभूमीत चार शवदाहकवेदिकेचे निर्माण

अकोला: जन्माला आल्यानंतर जीवनाचा अंत जेथे होते ते मरण. आयुष्य चढ-उतारात जगल्यानंतर मरण सुखद यावे, यासाठी मनुष्य झटत असतो. मरणानंतरही अत्यंविधी सुकर व्हावा, यासाठीदेखील तरतूद करतो; परंतु काहींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा लिहिल्या असतात. मृतदेहाची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही. नातेवाईक परिपूर्ण व्यवस्था करीत असले तरी काही वेळा स्मशानभूमीमध्ये अपूर्ण व्यवस्था असल्याने अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडत नाही; परंतु आता अकोल्यात तरी कोणालाही मरणानंतर हाल भोगावे लागणार नाही. कारण रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट या सामाजिक संस्थेने स्मशानभूमीत शवदाहकवेदिका निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाच्या संकल्पपूर्तीचा पहिला टप्पा पार पडला असून, जुने शहरातील गुलजारपुरा हिंदू स्मशानभूमीमध्ये चार शवदाहकवेदिकाचे लोकार्पण मंगळवार १० जून रोजी करण्यात आले.
अकोला ईस्टचे अध्यक्ष ॲड़ श्रीकांत सुरेका व सचिव रमण राठी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प तयार झाला. त्याला क्लबच्या पदाधिकार्‍यांसोबतच शहरातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले. अंदाजे सव्वा लाख रुपये खर्चून गुलजारपुरा स्मशानभूमीतील चार शवदाहकवेदिकेचे निर्माण व रंगरंगोटी करण्यात आली. तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला. येथे देखेरेख करण्यासाठी क्लबतर्फेच दोन बेरोजगार तरुणांची नियुक्ती करून त्यांना मानधन देण्यात येत आहे. या प्रकल्पाला विशेष आर्थिक सहकार्य लाभले ते ॲड़ देवेंद्र अग्रवाल यांचे. त्यांचे वडील स्व. रामगोपाल छगनलाल अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी एक लाख रुपयांची देणगी क्लबला दिली.

** आग प्रतिरोधक फरशा व पाईप
चारही शवदाहकवेदिकेवर आग प्रतिरोधक फरशा (टाइल्स्) व लोखंडी पाईप लावण्यात आले आहेत. यामुळे आगीच्या ज्वाळा वार्‍याच्या दिशेने सैरभैर न होता एकाच गतीमध्ये व ओट्यापुरत्या सीमित राहणार आहे. त्यामुळे ओट्याजवळ असलेल्या अंत्यसंस्कार करणार्‍यांच्या अंगावर ज्वाळा येणार नाहीत. आगेची धग जाणवणार नाही.

** उमरी स्मशानभूमीतील कामाला सुरुवात
उमरी स्मशानभूमीतही क्लबच्या वतीने दोन शवदाहकवेदिका निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले असून, बुधवार ११ जूनपासून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

** महानगरपालिकेचे सहकार्य
अकोला महानगरपालिकेने रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्टच्या प्रकल्पाचे कौतुक करून जेव्हा हा उपक्रम राबविण्यासाठी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी परवानगी काढली तेव्हा मनपाने कोणतीही आडकाठी न आणता सहज प्रकल्पाला मंजुरी दिली.