शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहाराने औषधांची मात्रा निष्प्रभ!

By admin | Updated: November 22, 2014 01:01 IST

रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम; शाखाहारच प्रकृतीस पोषक.

अकोला: मांसाहाराने, विशेषत: कोंबडीच्या मांसाचे अतिसेवन केल्याने औषधांची मात्रा निष्प्रभ होण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी पोल्ट्री व्यावसायीक टेट्रासाय क्लीन, फ्ल्यूरोक्विनोलीन व अमिनोग्लायकोसाईड या अँटीबोयोटिक्सचा भरमसाठ वापर करीत असल्याने, त्याचे घातक परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.मांसाहाराने शरिराला बळ मिळून रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा गैरसमज मोठय़ा प्रमाणात रूढ झाला आहे. वास्तविक, मांसाहार, विशेषत: कोंबड्यांचे मास मनुष्यासाठी घातक ठरत आहे. पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे वजन वाढविण्यासाठी अँटिबायोटिक्स औषधांचा वापर त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात केला जातो. या कोंबड्यांचे मांस सतत सेवन केल्यास, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्याचे आरोग्यावर दूष्परिणाम होत असल्याचे निष्कर्ष तज्ज्ञांनी काढले आहेत. कुक्कुट व्यावसायिक जास्त नफ्यासाठी कोंबड्यांचे वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी टेट्रासायक्लिन, फ्ल्यूरोक्विनोलोन व अमिनोग्लायकोसाईड या अँटिबायोटिक्सचा सर्रास वापर केला जातो. हीच अँटिबायोटिक औषधे विविध मानवी आजारावरही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरली जातात. कोंबड्यांचे वजन वाढीसाठीही सारख्याच औषधांचा वापर होत असल्याने, मानवी आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. या मासांच्या सेवनामुळे मनुष्याचे शरीर सामान्य औषधांना प्रतिसाद देत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पशु व मत्स्य विज्ञान पदव्युत्तर संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.सुनील हजारे यांनी बाजारात नव्याने उपलब्ध होत असलेल्या अँटिबायोटिक औषधाचा व त्याच प्रमाणे मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामावर संशोधन सुरु सून त्याविषयीच्या निष्कर्षाची प्रतिक्षा असल्याचे सांगीतले.