शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा अंतर्गत मूल्यमापन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 15:09 IST

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

अकोला : शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून राज्यात इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सत्रनिहाय करण्यात येणार आहे. विषयानुसार २० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या पुनर्विचार सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून इयत्ता नववीसाठी व शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती; परंतु या सत्रात इयत्ता दहावीच्या निकालानंतर दोन्ही इयत्तांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मूल्यमापन योजनेचा पुनर्विचार करण्यात आला. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, लेखी मूल्यमापनासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी पुन्हा एकदा अंतर्गत मूल्यमापनाला सुरुवात करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विषयानुसार विविध प्रकल्प देऊन त्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. हे मूल्यमापन प्रत्येक विषयाला २० गुणांसाठी असणार आहे.उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गुणविद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण अनिवार्य असणार आहेत. अंतर्गत मूल्यमापनामध्ये तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व बहुपर्यायी प्रश्न परीक्षा व उपक्रमांचा समावेश राहणार आहे.अंतर्गत मूल्यमापनाचे एकूण ७० गुणइयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा एकूण ७० गुणांची राहणार आहे. यामध्ये सर्वच विषयांसाठी २० गुणांची परीक्षा राहणार आहे.इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे मूल्यमापन पूर्वीप्रमाणेच करण्यात येणार आहे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र