काॅन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच : दक्षतेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST2021-04-20T04:19:01+5:302021-04-20T04:19:01+5:30

अकाेला : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली, तरी काेराेना फाेफावण्याचा वेग ग्रामीण भागात जास्त ...

In the name of contact tracing: the need for vigilance | काॅन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच : दक्षतेची गरज

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच : दक्षतेची गरज

अकाेला : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली, तरी काेराेना फाेफावण्याचा वेग ग्रामीण भागात जास्त दिसत आहे. शहरामध्ये काेराेना चाचणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबविली जात असून, महापालिकेने फिरते पथकही सुरू केले आहे, ग्रामीण भागात कोरोना चाचणींवर मर्यादा असून, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे ट्रेसिंग करण्याचे प्रमाणही कमी असल्याने काेराेना वेगाने वाढताे आहे.

टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट अशी त्रिसूत्री काेराेनावर मात करण्यासाठी असली, तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी, कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये मास्क, सोशल डिस्टन्स आणि हँड सॅनिटायझरचा वापर आजही पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे ग्रामीण भागात वेगाने पसरणारा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

गावांमध्ये यांचा वाॅच अपेक्षित जिल्हा आणि तालुक्याप्रमाणेच गावस्तरावरही कोरोनाची नियंत्रण समिती आहे.

समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांचा समावेश आहे.

ही समिती बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांवर वाॅच ठेवण्याचे काम करते.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज गावस्तरावर एखादी व्यक्ती पाॅझिटिव्ह आल्यास अशा ठिकाणी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येते.

तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडीसेविका आणि आशा काॅन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तपासणीची मोहीम पूर्ण करतात. या ठिकाणी यंत्रणा कमी पडते.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या

ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या

Web Title: In the name of contact tracing: the need for vigilance