शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून इसमाची हत्या

By admin | Updated: May 23, 2014 00:12 IST

प्रेत जमिनीत पुरले, भेंडगावच्या महिलेस अटक


पिंजर - बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथे एका इसमाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे खळबळजनक प्रकरण गुरुवारी उघडकीस आले. महादेव रामभाऊ निलखन रा. बार्शीटाकळी असे मृतकाचे नाव आहे. पिंजर पोलिसांनी या प्रकरणी मंजुळाबाई देवीदास भगत या महिलेस अटक केली आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, महादेव निलखन हा भेंडगावातील या महिलेच्या घरी नेहमी यायचा. २१ मे रोजी सकाळी तो येथे आला. दरम्यान मंजुळा व महादेव यांच्यात वाद झाला. यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी माहिती मंजुळाने पोलिसांना दिली; परंतु मंजुळाबाईने त्याचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत. मंजुळाबाईच्या घरात मरण पावलेल्या महादेवच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी तिने २२ मे रोजी दोन मजुराच्या मदतीने घरासमोर खड्डा खोदला. सकाळी ९.३० नंतर मजूर चहापाणी घेण्यासाठी बाहेर गेले असता, या महिलेने महादेवचे प्रेत त्या खड्ड्यात पुरले व माती ओढून घेतली. मंजुळाबाईच्या हालचाली सकाळपासूनच संशयास्पद वाटत असल्याचे शेजारी राहणार्‍या एका इसमाच्या लक्षात आले. मंजुळाबाईने अचानक खड्डा का खोदला? यावर गावात चर्चा सुरू झाली. यानंतर या खड्ड्यात कोणाचे तरी प्रेत असल्याचे समोर आले. या घटनेची माहिती पिंजर पोलिसांना मिळताच ठाणेदार एम.एम. ठाकरे व ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मंजुळाबाईला ताब्यात घेतले असता, तिने घटना सत्य असल्याचे सांगितले. मात्र, महादेवने आत्महत्या केली; मी त्याला जमिनीत पुरले, अशी माहिती मंजुळाबाईने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अनैतिक संबंधातून वाद निर्माण झाल्याने मंजुळाबाईनेच हा खून केल्याचा दावा पोलिस करीत आहेत. सध्या महादेव निलखन याचे प्रेत जमिनीत असून, तहसीलदारांच्या उपस्थितीत २३ मे रोजी जागेचे उत्खनन होणार आहे.