वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दौर्‍याचा धसका

By Admin | Updated: July 17, 2014 01:44 IST2014-07-17T01:38:32+5:302014-07-17T01:44:23+5:30

अकोला वैद्यकीय महाविद्यालयात पावसात रंगरंगोटी

Medical Education Minister's visit | वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दौर्‍याचा धसका

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दौर्‍याचा धसका

अकोला : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड गुरुवारी जिल्हय़ाचा दौरा करणार असल्याची माहिती मिळताच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दुर्गंधी असलेल्या भिंतीवर तातडीने रंगरंगोटी करण्याचे काम बुधवारी केले. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दौर्‍यापूर्वी लगबगीने करण्यात आलेल्या कामांमुळे काही वॉर्डातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात सकाळी १ वाजेपर्यंत असलेल्या बाहय़रुग्ण तपासणी विभागातील शौचालयांसमोर सिमेंट व रेतीचा ढीग ऐन वेळेवर लावण्यात आला होता. त्यामुळे रुग्णांना शौचास जाण्यास मोठी अडचण झाली. यासोबतच बाहय़रुग्ण विभागासह इतर बाहेरील भिंतीवर बुधवारी पहाटेपासून रंगरंगोटीचे कामकाज सुरू करण्यात आले होते. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे अनेकवेळा आग लागल्याचे प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतरही या ठिकाणी दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करणार्‍या वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दौर्‍यापूर्वी रंगरंगोटी केली. तसेच वॉर्डामध्ये अचानक स्वच्छता करून गाद्या व त्यावरील चादर स्वच्छ ठेवण्याचे नियोजन केले.
रुग्णांना कुठल्याही सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करणे आणि त्यांच्याशी उद्धट भाषेचा वापर करणार्‍या रुग्णालय प्रशासनाद्वारे मंत्र्यांच्या समोर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी मात्र पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. काही वॉर्डाच्या आतमध्ये कितीही धिंगाणा असला तरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेरील भिंती मात्र पांढर्‍या चुन्याने रंगविण्यात आल्या आहेत. मात्र, सांयकाळच्या पावसामुळे हा रंग निघून गेल्याने महाविद्यालय प्रशासनाचे नियोजन उघडे पडले.

Web Title: Medical Education Minister's visit