शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दारूची अवैध विक्री करणा-यांवर ‘मकोका’

By admin | Updated: April 11, 2017 02:23 IST

‘ऑपरेशन क्रॅक डाउन’; गृहमंत्रालयाकडून हालचाली.

सचिन राऊतअकोला: दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. १ ते २0 एप्रिल या कालावधीत देशी आणि विदेशी दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणार्‍यांवर वारंवार कारवाई झाल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोकानुसार) कारवाई करण्यात येणार आहेत. दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पोलिसांच्या "ऑपरेशन क्रॅक डाउन"मध्ये दारू विक्रेत्यांचा अहवाल तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५00 मीटर अंतरावर असलेले वाइन बार, वाइन शॉप बंद करण्यात आले आहेत. यामध्ये ८0 टक्के वाइन बार आणि दुकाने बंद झाल्याने दारूची अवैध वाहतूक आणि विक्रीला उधाण आले असतानाच अशा विक्री आणि वाहतुकीला रोखण्यासाठी पोलिसांकडून ह्यऑपरेशन क्रॅक डाऊनह्ण राबविण्यात येत आहे. दारूची अवैध विक्री करणार्‍यांचे कंबरडे मोडण्यासाठी दारू विक्रेत्यांवर मकोका कारवाई करण्याचेही गृहमंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. जिल्हय़ात २५१ परवानाधारक वाइन बार आणि वाइन शॉप होते; मात्र यामधील २२२ वाइन बार आणि वाइन शॉप एक एप्रिलनंतर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ २९ वाइन बार आणि वाइन शॉप जिल्हय़ात सुरू आहेत. राज्यात देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी तातडीने हालचाली करीत एकपेक्षा जास्त वेळा कारवाई झालेल्या दारू विक्रेत्यांवर मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. ह्यऑपरेशन क्रॅक डाऊनह्णअंतर्गत दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑपरेशन क्रॅक डाउन अंतर्गतच राज्यभरात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा सपाटा सुरू लावला आहे.  ११ ते २0 एप्रिलमध्ये होणार प्रस्ताव दारूची अवैधरीत्या वाहतूक आणि विक्री करणार्‍या लोकांचा प्रस्ताव ११ ते २0 एप्रिलदरम्यान तयार करण्यात येणार आहे. ज्या लोकांवर वारंवार कारवाई झाली, त्यांच्यावर तातडीने मकोका दाखल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. पोलीस खात्याकडून अशा लोकांची यादी तयार करण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे.