शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

महापौर-आयुक्तांमध्ये घमासान

By admin | Updated: May 15, 2015 01:39 IST

थकीत देयकांची यादी, ‘जीआयएस’वरून बिनसले

अकोला: थकीत देयकांची यादी, जीआयएस तसेच शहर बससेवेच्या निविदेसह प्रदर्शनाद्वारे विविध साहित्याची विक्री करणार्‍या संचालकाला आकारण्यात आलेल्या दंडात्मक रकमेच्या मुद्यावरून महापौर उज्ज्वला देशमुख आणि आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यात गुरुवारी हुतात्मा स्मारक येथे चांगलेच घमासान रंगले. ह्यअच्छे दिनह्णचा नारा देणार्‍या भाजपाकडून विकास कामांसोबतच मनपाच्या भ्रष्ट कामकाजाला आळा घालण्याची अकोलेकरांची अपेक्षा पूर्णत: फोल ठरली आहे. थकीत देयके अदा करण्याच्या बदल्यात १५ ते २0 टक्के कमिशनच्या हव्यासापोटी आता सत्ताधार्‍यांनीच खुला बाजार मांडला आहे. मनपाला प्राप्त निधीतून देयके अदा करण्यासाठी मर्जीतल्या कंत्राटदारांची यादी तयार करणे आणि त्याबदल्यात १५ ते २0 टक्के दलाली घेण्याचा एकसूत्री कार्यक्रम प्रशासनासह पदाधिकार्‍यांनी सुरू केला आहे. आयुक्त सोमनाथ शेटे यांच्याकडे यादी सादर करणार्‍यांमध्ये विरोधी पक्ष काँग्रेसचादेखील समावेश आहे, हे विशेष. रस्ता अनुदानापोटी प्राप्त झालेल्या १ कोटी २८ लाख रुपयांतून ८४ लाख रुपयांची देयके अदा करण्यासाठी महापौरांनी मर्जीतल्या नऊ कंत्राटदारांची नावे प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. संबंधित नऊ कंत्राटदारांच्या देयकांची नोटशिटसुद्धा तयार करण्यात आली; परंतु ऐनवेळेवर आयुक्तांनी ही नोटशिट बाजूला सारली. यासोबतच, जीआयएसच्या मुद्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांमधील अंतर्गत वाद शिगेला पोहचले आहेत. निविदेच्या फाईलवर स्पष्टपणे मत नमूद न करता, शहर अभियंता अजय गुजर यांना तांत्रिक अडचणीत गोवण्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांचा प्रयत्न आहे. अर्थातच, प्रशासन ही निविदा रद्द करण्याच्या तयारीत असून, प्रशासनाच्या भूमिकेला महापौरांचा विरोध आहे. हाच प्रकार शहर बससेवेच्या निविदेसंदर्भात आहे. यात भरीस भर शहरात प्रदर्शनाद्वारे विविध वस्तूंची विक्री करणार्‍या संचालकाला आयुक्तांनी एक लाखाचा दंड आकारला. या संपूर्ण मुद्यावर चर्चा करण्यासाठी गेलेल्या महापौर उज्ज्वला देशमुख व आयुक्तांमध्ये घमासान रंगल्याची माहिती आहे.