शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला समृद्धी योजनेत गैरव्यवहार

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

बुलडाणा जिल्हा व्यवस्थापकाचा काढला पदभार : कोट्यवधीचे वाटप थांबविले.

सिद्धार्थ आराख / बुलडाणाअण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या महिला समृद्धी योजनेमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पी.टी.पवार यांचा तडकाफडकी पदभार काढण्यात आला आहे. तर अमरावती विभागीय व्यवस्थापक जी.एस.साळुंके यांनी बुलडाणा कार्यालयातील संपूर्ण रेकॉर्ड जप्त करून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी राज्यातील अन्नाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला राज्यशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. महिला समृद्धी योजनेंतर्गत हा निधी खर्च करावयाचा होता. बुलडाणा येथील महामंडळाला नऊ कोटी रुपये प्राप्त झाले होते. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी वाटप करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार मोठय़ा प्रमाणावर प्रस्तावही बोलावण्यात आले. एका महिला लाभार्थ्याला ५0 हजार रुपये प्रमाणे जवळपास ११५३ प्रस्ताव बुलडाणा कार्यालयाने तयार केले. तर यापैकी २५0 चेकचे म्हणजे सुमारे १ कोटी २५ लाख रुपयाचे वाटपही केले; मात्र हे वाटप करताना कार्यालयातील अधिकारी व एजंट यांच्या संगनमताने शेकडो बोगस प्रस् ताव बनवून लाखो रुपयाचे वाटप सुरू असल्याच्या तक्रारी झाल्या. यामध्ये काही लाभा र्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणसुद्धा सुरू केले होते. याची गंभीर दखल घेत मुंबई कार्यालयाने अमरावती विभागीय कार्यालयाचे अधिकारी साळुंके यांना चौकशीसाठी बुलडाणा येथे पाठविले. साळुंके यांनी चौकशी करून उर्वरित १00 प्रस्ताव व त्यासोबत प्र त्येकी ५0 हजार रुपयाचे चेक असे संपूर्ण दप्तर जप्त केले. तर जिल्हा व्यवस्थापक पी.टी. पवार यांचा पदभार काढून लेखापाल विजय जाधव यांच्याकडे कार्यालयाचा पदभार दिला. हे प्रकरण आता जिल्हा व्यवस्थापक व कार्यालयातील कर्मचार्‍यांवर अंगलट येऊ शकते.महिला समृद्धी योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून लाभार्थ्यांना ५0 हजार रुपये तडकाफडकी मिळू लागल्याने प्रस्तावाचा ओघ वाढला होता. पुढे अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे चौकशी लागली व सध्या वाटप बंद झाले असल्याचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक विजय जाधव यांनी सांगीतले.