शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

‘महात्मा फुले सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा!’ - अविनाश ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 1:52 PM

महात्मा फुले सन्मानदिन महारॅलीचे प्रणेते  तथा ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ही मुहुर्तमेढ कुण्या एका समाजातील महिलांसाठी नव्हती. तर सर्वच समाजातील महिलांना न्याय देण्यासाठी होती. त्यांच्यावरील सामाजिक अन्याय, अत्याचार कमी करण्याचा दूरदृष्टीकोन त्यामागे होता. फुले दाम्पत्याच्या उदात्त विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे येथे १ जानेवारी रोजी फुले सन्मानदिन सोहळा आयोजित करण्यात येतो. सन्मानदिन सोहळा सर्वाभिमुख व्हावा, सर्वच समाजातील महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे एवढीच अपेक्षा आहे. महात्मा फुले सन्मानदिन महारॅलीचे प्रणेते  तथा ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...

महात्मा फुले सन्मानदिन सोहळ्याची पूर्वतयारी कधीपासून केली जाते?१ जानेवारी रोजी पुणे येथे सन्मानदिन सोहळा आयोजित करण्यात येतो.  सोहळ्याच्या दोन महिन्यांपूर्वीच जनजागृती करण्यात येते. यासाठी विभागनिहाय दौरे आयोजित करण्यात येतात. यावर्षी २७ नोव्हेंबरला अमरावती,पश्चिम येथे दौरा झाला.२८ नोव्हेंबर रोजी चिखली आणि जालना तर ३० नांदुरा आणि खामगाव, १ डिसेंबर अकोला येथे जागृती सभा घेतली.

सन्मानदिन सोहळ्याच्या माध्यमातून शासनाकडून अपेक्षा काय?फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’हा किताब मरणोत्तर देऊन सन्मानित करावे, भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करावे.  

महात्मा फुले सन्मानदिन सोहळयात समाजाकडून अपेक्षा काय?स्त्रीयांच्या उन्नती, उत्कर्षांसाठी राष्ट्रपिता महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांचे योगदान मोठं आहे. फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी आणि महिलांच्या शिक्षणाच्या ‘ज्योती’ला उजाळा देण्यासाठी  सन्मानदिन महारॅली आयोजित केली जाते. दिशाभूमी आणि चैत्यभूमीवर ज्याप्रमाणे जनसागर उसळतो. तसाच जनसागर फुले सन्मानदिन सोहळ्याला अपेक्षीत आहे.  जागृतीनंतरही ही गर्दी २५ हजारावर वाढत नाही. ही खंत आहे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी चैत्यभूमी व दीक्षाभूमीवर ज्याप्रमाणे अलोट जनसागर स्वयंस्फुर्तीने उसळतो. त्याप्रमाणेच पुणे येथे १ जानेवारी रोजी महात्मा फुले स्मृतीदिन सोहळा साजरा करण्याचे प्रामाणिक प्रयत्न आपले आहेत

 ‘सन्मान दिन’ सोहळ्याला कधी सुरूवात केली?१ जानेवारी १८४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी  पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांची नेमणूक केली.या ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी १ जानेवारी २०१४ पासून महात्मा फुले सन्मानदिन सोहळ्याला सुरूवात केली. सन्मानदिनी भिडेवाडा ते महात्माफुलेवाडा अशी रॅली काढण्यात येते. या रॅलीत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून माळी समाजबांधव मोठ्यासंख्येने सहभागी होतात. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षाच्या राजकीय पुढाºयांसह सामाजिक नेत्यांची उपस्थिती असते. गत पाच वर्षांपासून सन्मानदिन सोहळा उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे. सोहळ्याला सुरूवात केल्याचे मनोमन समाधान आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत