शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानामुळेच जीवन सहज, सुसह्य

By admin | Updated: January 7, 2015 01:32 IST

श्री शिवाजी महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विषयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उच्च शिक्षण सल्लागार जामोदे यांचे प्रतिपादन.

अकोला : मानवी जीवनाच्या विकासात विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञानामुळे जीवन सहज व सुसह्य झाले असल्याने प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन खोलवर रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अमरावती येथील उच्च शिक्षण सल्लागार डॉ. एम. व्ही. जामोदे यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने ह्यमायक्रोबॉयल सायन्समधील नवा प्रवाहह्ण या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. एम. व्ही. जामोदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, बांग्लादेशातील राजशाही विद्यापीठाचे डॉ. गुलाम शब्बीर सत्तार, डॉ. तंजिमा यास्मिन व डॉ. लत्फनिसा बारी, मायक्रोबायलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे व समन्वयक डॉ. मुसाद्दिक खान उपस्थित होते. डॉ. तंजिमा यास्मिन यांनी सूक्ष्मजीवशास्त्रातील आधुनिक प्रवाहाबद्दल माहिती विविध उदाहरणांद्वारे सादर केली. उद्घाटन सत्रानंतर दुबईहून डॉ. निरू सूद यांचे व्हच्यरुअल मार्गदर्शन थेट प्रसारित करण्यात आले. त्यांनी जीवशास्त्र विषयात घडणार्‍या विविध बदलांची व नवीन प्रवाहांची माहिती दिली. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. ए. एम. देशमुख यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मौलिक विचार व्यक्त केले. जेवणानंतर झालेल्या दुपारच्या सत्रात डॉ. लत्फनिसा बारी यांचे मार्गदर्शन लाभले. या सत्राच्या अध्यक्षपदी प्रा. देवकर होते. सूत्रसंचालन डॉ. दीपाली बराटे यांनी केले. आभार डॉ. आशीष राऊत यांनी मानले.