शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची गुंतागुंत बाल कामगारांच्या जीवावर

By admin | Updated: June 12, 2014 20:31 IST

बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

अकोला : ह्यमुले देवाघरची फुलेह्ण असे मोठय़ा कौतुकाने म्हटल्या जाते; मात्र याच बालकांचा कायद्याच्या गुंतागुंतीमुळे धोकादायक कामांसाठी मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येत आहे. बालकामगारांच्या वयासंदर्भात कायद्याची मोठी गुंतागुंत असल्याने बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडून मागील वर्षभरात टाकण्यात आलेल्या धाडसत्रात केवळ ८ ते ९ दुकान मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
भारताच्या राज्यघटनेनुसार १४ वर्षाआतील मुले ही बालके आहेत. या वयाच्या आतमध्ये असलेल्या मुलांना कामावर ठेवल्यास त्यांच्यावर बालकामगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येते; मात्र १९९२ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय बालहक्क संहितेवर स्वाक्षरी केली असून, या संहितेमधील १९८९ च्या कलम १ अन्वये १८ वर्षाआतील मूल हे बालक आहे. एखाद्या दुकानामध्ये बालकामगार काम करीत असल्याची माहिती कामगार आयुक्तांना मिळाली आणि त्यांनी संबंधित ठिकाणावर धाड टाकल्यानंतर सदर बालकामगार १४ वर्षाच्या आत असल्यास कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्तांना आहेत; मात्र बालकामगार १४ वर्षाच्या वर असल्यास त्यावर कारवाई करण्यास मोठी अडचण आहे. १४ ते १६ वयोगटातील अनेक मुले बालकामगार म्हणून काम करीत आहेत; मात्र विविध कायद्यांमधील वयाच्या गुंतागुंतीमुळे बालकामगार ठेवणार्‍यांवर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेलाही अडचणी निर्माण होत आहेत. मागील वर्षभरामध्ये बालकामगार ठेवणार्‍या ठिकाणांवर धाडसत्र करण्यात आले; मात्र कारवाईचे प्रमाण अल्प असल्याचे समोर आले आहे.