शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त

By admin | Updated: July 24, 2014 23:00 IST

अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.

वाशिम: महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू झाल्यानंतर अकोल्याच्या अन्न व औषध प्रशासनाने अकोला व वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षात एकूण ७४ कारवायांमधून ६२ लाखाचा गुटखा जप्त केला आहे.
राज्य शासनाने २0 जुलै २0१२ रोजी राज्यात गुटखा बंदी केली आहे. गुटखाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनावर सोपविली आहे. वाशिम जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने अकोला येथूनच वाशिमच्या कारभाराचा गाडा हाकला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने सद्यस्थितीत वाशिम व अकोला जिल्ह्यातील २४00 व्यापार्‍यांना व्यवसायाचे परवाने दिले आहेत. तर तीन हजार लघु व्यावसायिकांची नोंदणी या विभागाकडे आहे. २0 जुलै २0१२ ते २0 जुलै २0१४ या दोन वर्षात गुटखाबंदीचे आदेश असतानाही गुटख्यांच्या काळाबाजाराला ब्रेकच नव्हता. अन्न व औषध प्रशासनाने या दोन वर्षात गुटखा विक्रीविरोधात कारवाया केल्या आहेत. गुटखा जप्तीच्या एकूण ७४ कारवाया केल्या असून ६२ दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी २0 प्रकरण न्यायालयात दाखल असून सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. ६२ लाख १४ हजार ३९८ रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. एकिकडे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई तर दुसरीकडे गुटखाकिंगचा गुटख्याचा काळाबाजार जिल्ह्यात पाय रोवत असल्याचे दिसून येते. वाशिम येथे अन्न व औषध प्रशासनाचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने जिल्ह्यात बंदीतही गुटख्यातून चांदीच होत असल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यात रिसोड येथे गुटख्याचा साठा अनेकवेळा पकडण्यात आला आहे. या बाबीने रिसोड हे गुटखा विक्रीचे केंद्र बनले असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.