शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य पदार्थांची चढय़ा दराने विक्री केल्यास खैर नाही!

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर सर्रासपणे दामदुप्पट किमतीने विकले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने २१ मे रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणली होती.

अकोला : एका नामांकित कंपनीच्या इन्स्टिट्युशनल पॅकमधील आईस्क्रीम कप खुल्या स्वरूपात विकण्याची परवानगी नसतानादेखील अकोला रेल्वे स्थानकावरील फलाटांवर सर्रासपणे दामदुप्पट किमतीने विकले जात असल्याची बाब ह्यलोकमतह्णने २१ मे रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणली होती. या बाबीची दखल घेत, मध्य रेल्वेचे भुसावळ येथील अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक प्रदीप बारापात्रे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या चमूने बुधवार, २८ मे रोजी रेल्वे स्थानकावरील खाद्य पदार्थांच्या दुकानांची तपासणी केली. या पाहणीदरम्यान रेल्वे प्लॅटफार्मवर चढय़ा दराने खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांची खैर नसल्याचा इशारा देण्यात आला. उन्हाळा असल्याने अबालवृद्धांचा थंड पदार्थ सेवन करण्याकडे अधिक ओढा असतो. एका नामांकित कंपनीचे आईस्क्रीम खुल्या स्वरूपात विकण्याची परवानगी नसतानादेखील प्रवाशांना दामदुप्पत दराने ते विकण्याचा सपाटा मध्य रेल्वेच्या एक, दोन व तीन नंबरच्या फलाटांवरील काही वेंडर्सनी चालविला होता. याबाबत माहिती मिळताच ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशन करून सदर बाब उघडकीस आणली होती. अशा पद्धतीने नामांकित कंपनीचे पदार्थ विकून प्रवाशांना उल्लू बनविणार्‍या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणार आसल्याचे संकेत बुधवारी अकोला रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भुसावळ येथील अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक प्रदीप बारापात्रे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन. जी. बोरीकर यांनी दिलेत. यामुळे आत्तापर्यंत कुठल्याही कारवाईची तमा न बाळगणार्‍या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.