शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडातील सिंचन प्रकल्पांची कामे अर्धवट!

By admin | Updated: June 21, 2014 01:27 IST

अकोला जिल्ह्यातील एकाच प्रकल्पाची घडभरणी झाली असून इतर सर्वच सिंचन प्रकल्पाची कामे रखडली

अकोला : जिल्ह्यातील तीन सिंचन प्रकल्पांपैकी प्रत्यक्षात एकाच प्रकल्पाची घडभरणी झाली असून, इतर सर्वच सिंचन प्रकल्पाची कामे अर्धवट स्वरू पात रखडली आहेत. कवठा बॅरेज व सुकळी सिंचन प्रकल्पाचे कामही थंडबस्त्यात पडले आहे. पश्‍चिम विदर्भातील ३३ प्रकल्पाची घडभरणी यावर्षी होणे अपेक्षित होते; परंतु यातील सर्वच प्रकल्पाची कामे रखडली आहेत.
विभागातील १0२ प्रकल्पांची कामे व्हावी, यासाठी राज्यपालांनी या प्रकल्पाचा समावेश अनुशेष यादीत केलेला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १0 प्रकल्पांपैकी बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेज, सुकळी अकोला, पोपटखेड टप्पा दोन आकोट, कवठा शेलू व पातूर तालुक्यातील प्रकल्पांची घडभरणी यावर्षी जूनमध्येच होणे अपेक्षित होती. तथापि यातील हिवरा या एकाच प्रकल्पाची घळभरणी झाली आहे. या प्रकल्पाची सुधारित किंमत मात्र वाढली आहे. तथापि, सुकळी प्रकल्प अजून भूसंपादनाच्या गर्तेत अडकला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता जानेवारीमध्ये पाटबंधारे विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. कवठा बॅरेज बाळापूर तालुक्यातील गावांना वरदान ठरणार आहे. तथापि, या बॅरेजची अवस्था इतर प्रकल्पासारखी अधांतरी आहे. पोपटखेड टप्पा २ या प्रकल्पाला तर या यादीतूनच वगळले आहे. नेरधामणाचे काम सुरू झाले आहे. या कामाला गती देण्याची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास खारपाणपट्टय़ातील शेती व शेतकर्‍यांना लाभ होईल. अनेक प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यास या कामांना सुरुवात होईल; परंतु पावसाळा लागल्याने या प्रकल्पाची कामे आता दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय मान्यतेअभावी अनेक प्रकल्प रखडलेसुकळी व अन्य प्रकल्पाचे सुधारित प्रशासकीय प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यांना मान्यता मिळेल. हिवरा प्रकल्पासह इतर प्रकल्पांची घडभरणी झाली आहे. उर्वरित कामे मार्गी लागतील असे पाटबंधारे अधीक्षक अभियंता जलतारे,यांनी सांगीतले.