शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक पोखरताहेत घुशी

By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST

अकोला रेल्वेस्थानक प्रशासनाला सध्या वेगळय़ाच समस्येने ग्रासले आहे.

अकोला : मॉडेल स्टेशनचा दर्जा असेल्या अकोला रेल्वेस्थानक प्रशासनाला सध्या वेगळय़ाच समस्येने ग्रासले आहे. परिसरात घुशींचा वावर अधिक वाढलयाने रेल्वे रुळ आणि फलाटांवर प्रवाशांनी इतस्त: फेकलेले अन्नपदार्थांचे कण खाण्यासाठी फिरणार्‍या घुशी परिसरातच बिळ करून रेल्वे स्थानक परिसरातील जमिन पोखरून काढत आहेत. पोखलेली जमिन बुजविताना रेल्वे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. अकोला रेल्वेस्थानक व परिसरात कायम येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, नको असलेले अन्न पदार्थ इतस्त: टाकणार्‍या प्रवाशांच्या वृत्तीमुळे रेल्वे स्थानकाचा गाभा पोखरला जात असल्याची माहिती साफसफाई आणि डागडुजीची कामे करणार्‍या अधिकार्‍यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. अकोला रेल्वेस्थानकाच्या निर्मितीला अनेक वर्षे उलटून गेली आहेत. निकृष्ट होणार्‍या प्रत्येक गोष्टींची या ठिकाणी वारंवार डागडुजी केली जाते. रेल्वेने प्रवास करणार्‍या किंवा फलाटांवर उभ्या असलेल्या प्रवाशांकरवी रेल्वे रुळांवर आणि फलाटावर इतस्त: टाकलेले अन्न, पदार्थ खाण्यासाठी फिरणार्‍या घुशी स्थानक परिसरात बिळ करून राहतात. रेल्वे रुळावर पडलेले अन्न खाणार्‍या घुशी रुळांखालचा भाग तर पोखरतातच, शिवाय फलाटाचा गाभादेखील पोकळ करीत आहेत. वाट मिळेल तिकडे पोखरून बिळ करणार्‍या घुशींमुळे फलाटांवरील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांमध्ये माती साठते. खालचा भाग पोकळ झाल्याने फलाटांवर लावलेल्या टाईल्स अनेकदा उखडल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसरात व फलाटांवर ठिकठिकाणी नको असलेले अन्न पदार्थ आणि इतर कचरा टाकण्यासाठी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा उपयोग फारसा प्रवासी करीत नसल्याने घुशींवर आळा घालणे कठीण होऊन गेले असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.